E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात दोषींवर कारवाई होणार?
Wrutuja pandharpure
26 Mar 2025
मुख्यमंत्र्यांकडून संकेत
पुणे
: परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी जबाबदार पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते सुनील माने यांनी केली होती. मंगळवारी विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत बोलताना या प्रकरणी पोलिस अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे सुनील माने यांनी स्वागत केले आहे.
याबाबत अधिक बोलताना सुनील माने म्हणाले, परभणी येथे असलेल्या संविधान प्रतिकृतीचा काही दिवसांपूर्वी एका समाजकंटकाने तोडफोड करून अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागले होते. याप्रकरणी पोलिसांनी ५० हून अधिक लोकांवर मुख्य आरोपी म्हणून तर ३०० ते ४०० जणांवर सह आरोपी म्हणून गुन्हा नोंद करून अनेक तरुण, महिला यांना अटक केली होती. पोलिसांनी वस्तीत कोंबिंग ऑपरेशनसुद्धा केले होते. पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. हा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचे त्याच्या मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीतून स्पष्ट झाले होते. मी स्वत: सुद्धा परभणी येथे जाऊन याबाबत स्थानिकांशी चर्चा करून माहिती घेतली होती. गावकर्यांकडून घेतलेल्या माहितीवरून सुद्धा हे स्पष्ट होत होते.
पोलिस मात्र सोमनाथचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगत होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सभागृहात हेच सांगितले होते. याप्रकरणी मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. आयोगाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. नुकताच न्यायदंडाधिकारी यांनी हा चौकशी अहवाल आयोगाला सादर केला. त्यात सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे आमच्या म्हणण्यावर शिक्कामोर्तब झाल्याने पुन्हा मी दोषी पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
याबाबत काल सभागृहात निवेदन करताना मुख्यमंत्र्यांनी, अहवालात पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सिद्ध झाल्यास नक्की दोषी अधिकार्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेचे आम्ही स्वागत करत असल्याचे सांगत याप्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन सूर्यवंशी कुटुंबाला न्याय द्यावा अशी मागणी माने यांनी केली आहे.
Related
Articles
वाचक लिहितात
01 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी
01 Apr 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी
01 Apr 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी
01 Apr 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
वाचक लिहितात
01 Apr 2025
दिल्लीचे कायदा मंत्री मिश्रा यांना न्यायालयाचा दणका
02 Apr 2025
वाल्मिक कराड, सुदर्शन घुलेला तुरूंगात चोप
01 Apr 2025
‘अवंतिका’ व्यक्तीरेखा साकारल्यानंतर अधिक खंबीर बनले : मृणाल कुलकर्णी
01 Apr 2025
नीतीश राणाचे वेगवान अर्धशतक
31 Mar 2025
मुंबईत ड्रोन वापरावर महिनाभर बंदी
04 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायाधीश वर्मा यांच्या बदलीबाबत फेरविचार?
2
आरक्षणाचे राजकारण
3
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
4
म्यानमार, थायलंडला भूकंपाचा धक्का
5
अमेरिकेत आयात होणार्या मोटारींवर २५ टक्के कर
6
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’