E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानी सैन्याचा बलुच आंदोलकांवर गोळीबार; तीन ठार
Wrutuja pandharpure
23 Mar 2025
क्वेटा
: पाकिस्तानातील क्वेटा येथे शांततापूर्ण आंदोलन करणार्या बलूच नागरिकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले. तर १२ ते १४ जण जखमी झाले आहेत. शनिवारी पहाटे ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. बलुचिस्तानमध्ये बलूच नॅशनल मूवमेंट आणि बलूच स्टुडेंट ऑर्गनायझेशन आझादसारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची सुटका करा, या मागणीसाठी बलूच नागरिक आंदोलन करत होते. लष्कराविरोधात जोरदार निदर्शने करण्यात येत होती. त्याचवेळी पाकिस्तानी सैन्याने आंदोलकांवर बळाचा वापर केला. त्यावेळी आंदोलकांनीही सैन्यावर दगडफेक केली. यावेळी पाकिस्तानी सैन्याने बलूच नॅशनल मूवमेंटचे प्रमुख कार्यकर्ते महरंग बलूच आणि इतरांना अटक केली आहे.
राज्य सुरक्षा दलाने शनिवारी सकाळी महिला आणि लहान मुलांवरही हल्ला केला गेला. आंदोलनस्थळी तिघांचा मृत्यू झाला. घटनेचा निषेध करताना बलुच कार्यकर्ते महरंग बलोच म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. बलूच यकजेहती कमिटीने त्यांच्या सेंट्रल कमिटीतील सदस्य बेबर्ग, त्याचा भाऊ हम्माल, डॉ. इलियास, बलूच महिला सईदा आणि अन्य लोकांच्या सुटकेची मागणी केली होती. क्वेटा येथे शांततेत आंदोलन करणार्या बलूच कार्यकर्त्यांवर पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला. सुरुवातीपासून पाकिस्तान सरकार आमच्या आंदोलनावर हिंसक उत्तर देत आहे. राज्य सुरक्षा दलाने बलूच आंदोलनकर्त्यांवर लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सामूहिक अटकेनंतर आणखी तीव्र कारवाई केली. सैन्याकडून झालेल्या गोळीबारात ३ बलूच लोक मारले गेले, त्याशिवाय अन्य जखमी झाले. पाकिस्तानी सैन्याने बलूच महिला आणि लहान मुलांनाही सोडले नाही. गोळीबारात ठार झालेल्या तीन जणांचे मृतदेहही सुरक्षा दलाने बळजबरीने त्यांच्या ताब्यात घेतले. ज्या आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या मृतदेहांवर नमाज पठण करण्याची योजना बनवली होती. त्यांनाही फरफटत बख्तरबंद गाड्यांमध्ये नेण्यात आले, असेही महरंग यांनी सांगितले.
Related
Articles
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
इंडिगो कंपनीच्या बाजारमूल्याची उंच भरारी
10 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
मस्क यांच्यामुळे भारतीय आयटी उद्योगात तणाव
07 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
इंडिगो कंपनीच्या बाजारमूल्याची उंच भरारी
10 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
मस्क यांच्यामुळे भारतीय आयटी उद्योगात तणाव
07 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
इंडिगो कंपनीच्या बाजारमूल्याची उंच भरारी
10 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
मस्क यांच्यामुळे भारतीय आयटी उद्योगात तणाव
07 Apr 2025
कचरा डेपोमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
10 Apr 2025
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
10 Apr 2025
इंडिगो कंपनीच्या बाजारमूल्याची उंच भरारी
10 Apr 2025
पुण्यातील तपमान ४३ अंशांवर
10 Apr 2025
सप्तश्रृंगी गडावर भाविकांची अलोट गर्दी
11 Apr 2025
मस्क यांच्यामुळे भारतीय आयटी उद्योगात तणाव
07 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
मतांसाठी ‘सौगात’
3
जीवन उद्ध्वस्त करणारा धरणीकंप
4
शेतकर्यांना टोमॅटोचा फटका
5
विश्वासही द्या (अग्रलेख)
6
टोल वसुलीत भरडतो सामान्य माणूस