E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
पाकिस्तानी लष्कराविरोधात उठाव करा
Samruddhi Dhayagude
22 Mar 2025
तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे आवाहन
इस्लामाबाद : पाकिस्तानी लष्कराविरोधात उठाव करण्याची घोषणातेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नूर वली महसूद याने केली आहे. या संदर्भातील एक चित्रफीत त्याने प्रसारीत केली आहे. सुमारे दोन वर्षानंतर प्रथमच त्याने अशा प्रकारचा इशारा लष्कराला दिला आहे. त्यामुळे लष्करावर हल्ले वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तेहरीक - ए - तालिबान पाकिस्तान (टीटीपी) दहशतवादी सघंटनेने खैबर पख्तुनख्वा प्रांत अगोदरच पाकिस्तानपासून तोडला आहे. तेथे दहशतवाद्यांची हुकूमत चालते. दरम्यान, संघटनेने लष्कराविरोधात मोहीम राबविली आहे. त्या मोहिमेला अल-खांदक असे नाव दिले आहे. पाकिस्तानातील बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा प्रांतातील नागरिकांवर लष्कर आकसाने कारवाई करत असून बलूच आणि पश्तून वंशीयांना लक्ष्य केले जात आहे. गेल्या ७० वर्षांपासून त्यांच्यावर अन्वनित अत्याचार केले जात आहे. लष्कर त्यांना माणसाप्रमाणे वागणूक देत नाही. वास्तविक बलूच आणि पश्तून नागरिकांचा तेथील साधन संपत्तीवर पहिला हक्क आहे. मात्र, तो हिरावून घेण्याचे उद्योग लष्कराकडून सुरू आहेत. नैसर्गिक साधन संपत्ती लुटून नेली जात आहे. त्याचा मोबदला प्रांताला परत दिला जात नाही. नागरिकांवर जुलूम केले जात आहेत.. कारवाईच्या नावाखाली हजारो नागरिकांना गायब देखील केले आहे. त्यातून मौलवी देखील सुटलेले नाहीत. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील अनेक मौलवींना ठार मारणारी ही कुठली फौज ?, असा प्रश्न देखील त्याने आहे. लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर स्वत:ची तुलना अल्लाशी करत आहे. तसेच पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी ऐषोआरामचे जीवन जगत आहेत. ज्या फौजेने बलूचिस्तानमध्ये कत्तल केली. त्याच फौजेने अफगाणिस्तान चिरडण्याचा प्रयत्न केला. अशा फौजेत सैनिकांनी राहू नये, सैनिकांनी बंड करावे. सैनिक आणि नागरिकांनी भ्रष्ट पाकिस्तानी लष्कराविरोधातील जिहादमध्ये सामील व्हावे, असे आवाहन त्याने केले. त्याच्या या आवाहनामुळे अफगाणिस्तान सीमेवर पाकिस्तान लष्कराच्या अडचणी वाढण्याचा धोका अधिकच वाढला आहे.
पाकिस्तानचे लष्कर दोषी
हक्कानिया मशिदीतील बॉम्बस्फोट आणि मौलाना हमीद उल हक आणि इतर धार्मिक विद्वानांच्या हत्येसाठी नूर वली महसूद याने पाकिस्तानी लष्कराला जबाबदार ठरवले आहे.
’मुल्ला’ मुनीर काय करणार?
पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ’मुल्ला’मुनीर म्हणूनही ओळखले जाते. पाकिस्तानी राज्यकर्त्यांसोबत बंद दरवाजाआड त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर पाकिस्तानी लष्कराने सीमेपलीकडील दहशतवाद्यांच्या ठिकाणावर हल्ला करण्याची घोषणा केली. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानचे लष्कर अफगाणिस्तानच्या भूमीवर आणखी हवाई आणि जमिनीवर हल्ले करण्याची शक्यता वाढली आहे. पर्यायाने पाकिस्तानचे सरकार आणि अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे संबंध बिघडू शकतात.
बलूचिस्तानच्या नव्या राज्यघटनेची घोषणा
बलुचिस्तानच्या नव्या राज्यघटनेची घोषणा बलोच लिबरेशन स्ट्रगलने शुक्रवारी जाहीर केला. भारताच्या राज्यघटनेप्रमाणे ती तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. बलूचिस्तान १६६६ मध्ये स्वतंत्र देश होता. १७४९ मध्ये त्याचा नकाशा प्रसिद्ध केला होता. अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान यांच्या मधील भाग बलुचिस्तान होता. मीर नसीर हान यांनी देशाला आकार दिला. १८३९ मध्ये ब्रिटिशांनी घुसखोरी केली होती. नंतर गोल्ड स्मिथ आणि डोनल्ड सीमा रेषा बनविली होती, असे सांगण्यात आले.
Related
Articles
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
28 Mar 2025
बांगलादेशात विद्यार्थी नेते आणि लष्करात वादाला सुरवात
24 Mar 2025
पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार
26 Mar 2025
स्थिती विदारक आहे...
23 Mar 2025
हिंजवडी पोलिसांनी वाहतूक कंपन्यांची घेतली बैठक
24 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
28 Mar 2025
बांगलादेशात विद्यार्थी नेते आणि लष्करात वादाला सुरवात
24 Mar 2025
पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार
26 Mar 2025
स्थिती विदारक आहे...
23 Mar 2025
हिंजवडी पोलिसांनी वाहतूक कंपन्यांची घेतली बैठक
24 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
28 Mar 2025
बांगलादेशात विद्यार्थी नेते आणि लष्करात वादाला सुरवात
24 Mar 2025
पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार
26 Mar 2025
स्थिती विदारक आहे...
23 Mar 2025
हिंजवडी पोलिसांनी वाहतूक कंपन्यांची घेतली बैठक
24 Mar 2025
निवडणूक आयोग अकार्यक्षम : सिब्बल
24 Mar 2025
अमेरिकेत शिकणार्या भारतीय विद्यार्थ्यांवर टांगती तलवार
28 Mar 2025
बांगलादेशात विद्यार्थी नेते आणि लष्करात वादाला सुरवात
24 Mar 2025
पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार
26 Mar 2025
स्थिती विदारक आहे...
23 Mar 2025
हिंजवडी पोलिसांनी वाहतूक कंपन्यांची घेतली बैठक
24 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
युपीआय व्यवहारावर कर?
3
राजीनाम्याने प्रश्न संपलेला नाही
4
दुधाची दरवाढ (अग्रलेख)
5
’वैशाली’च्या मालकाच्या जावयास अटक
6
व्हिसा बनले शस्त्र (अग्रलेख)