E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
भारतीय क्रिकेट संघाला ५८ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर
Wrutuja pandharpure
21 Mar 2025
मुंबई
: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५ च्या विजेत्या भारतीय संघावर बक्षीसांचा वर्षाव केला. भारतीय क्रिकेट संघासाठी मंडळाने ५८ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. हा पुरस्कार खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आणि अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीला देण्यात येणार आहे. कोणाला किती पुरस्कार मिळणार हे मंडळाने आपल्या निवेदनात सांगितले नाही.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने या महिन्याच्या सुरुवातीला अंतिम फेरीत न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. कर्णधार रोहित शर्माच्या कुशल आणि चतुर नेतृत्वाखाली, भारताने स्पर्धेतील आपले वर्चस्व कायम राखले आणि स्पर्धेत अपराजित राहून जेतेपदावर कब्जा केला. रोहित ब्रिगेडने आपला वेग कायम ठेवत न्यूझीलंडवर ४४ धावांनी विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव केला. अंतिम फेरीत भारताने किवीवर ४ बळीनेे विजय मिळवला.
बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, ’सलग आयसीसी खिताब जिंकणे विशेष आहे. आणि हा पुरस्कार जागतिक स्तरावर टीम इंडियाचे समर्पण आणि उत्कृष्टता दर्शवतो. आयसीसी १९ वर्षाखालील महिला विश्वचषक जिंकल्यानंतर २०२५ मधील ही आमची दुसरी आयसीसी चषक देखील आहे, जी आपल्या देशात सध्याच्या मजबूत क्रिकेट प्रणालीवर प्रकाश टाकते. आयसीसी चॅम्पियन्स चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा चार बळी राखून पराभव केला. अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयासाठी २५२ धावांचे लक्ष्य होते, जे त्यांनी एक षटक बाकी असताना पूर्ण केले. भारतीय संघाने तिसर्यांदा चॅम्पियन्स चषक जिंकला आहे. २००२ च्या मोसमात भारतीय संघ पहिल्यांदा चॅम्पियन झाला होता. त्यानंतर त्याने श्रीलंकेसोबत संयुक्तपणे विजेतेपदाची कमाई केली. त्यानंतर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१३ साली चॅम्पियन बनला. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मेन इन ब्लूने इतिहास निर्माण केला.
यापूर्वी २०२५ ची चॅम्पियन्स चषक जिंकूनही भारतीय संघावर पैशांचा वर्षाव झाला होता. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणार्या भारतीय संघाला अंदाजे १९.४८ कोटी रुपये (२.२४ दशलक्ष) मिळाले. तर अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला म्हणजेच न्यूझीलंडला अंदाजे ९.७४ कोटी रुपये (१.१२ दशलक्ष) मिळाले.
आयसीसीने बक्षिसाची रक्कम आधीच जाहीर केली होती. विशेष बाब म्हणजे उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांनाही तेवढीच रक्कम ४.८७ कोटी रुपये देण्यात आली. म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे संघही श्रीमंत झाले. गटातून बाहेर पडलेल्या संघांना बक्षिसाची रक्कमही मिळाली. पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील संघांना (अफगाणिस्तान आणि बांगलादेश) समान रक्कम ३,५०,००० (अंदाजे ३.०४ कोटी रुपये) मिळाली. तर सातव्या आणि आठव्या स्थानावरील संघांना (पाकिस्तान आणि इंग्लंड) समान रक्कम १,४०,००० (सुमारे १.२२ कोटी रुपये) मिळाली. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. ग्रुप स्टेजमधील सामना जिंकण्यासाठी संघाला ३४००० डॉलर (सुमारे २९.६१ लाख रुपये) मिळाले. याशिवाय आठही संघांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १,२५,००० (अंदाजे रु. १.०८ कोटी) ची हमी रक्कम देण्यात आली आहे. आयसीसीने या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण ६.९ दशलक्ष (सुमारे ६० कोटी रुपये) बक्षीस रक्कम वितरित केली. हे २०१७ च्या तुलनेत ५३ टक्के अधिक आहे.
चॅम्पियन्स चषक बक्षीस रक्कम:
विजेता संघ (भारत): २.२४ दशलक्ष (रु. १९.४८ कोटी)
उपविजेता (न्यूझीलंड): १.२४ दशलक्ष (रु. ९.७४ कोटी)
सेमीफायनल (ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका): ५,६०,००० (रु. ४.८७ कोटी)
पाचवा-सहावा संघ (अफगाणिस्तान आणि बांगलादेश): ३,५०,००० (रु. ३.०४ कोटी)
सातवा-आठवा संघ (पाकिस्तान आणि इंग्लंड): १,४०,००० (रु. १.२२ कोटी)
ग्रुप स्टेज विजय: ३४,००० (रु. २९.६१ लाख)
हमी पैसे: १,२५,००० (रु. १.०८ कोटी)
Related
Articles
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
04 Apr 2025
विधी महाविद्यालय रस्ता सर्वांत महागडा
02 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
टेस्लाच्या मोटारी पेटवा!
31 Mar 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
04 Apr 2025
विधी महाविद्यालय रस्ता सर्वांत महागडा
02 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
टेस्लाच्या मोटारी पेटवा!
31 Mar 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
04 Apr 2025
विधी महाविद्यालय रस्ता सर्वांत महागडा
02 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
टेस्लाच्या मोटारी पेटवा!
31 Mar 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
भंडार्यात वीज कोसळून दोन शेतमजुरांचा मृत्यू
04 Apr 2025
विधी महाविद्यालय रस्ता सर्वांत महागडा
02 Apr 2025
ममता बॅनर्जी सरकारला धक्का
04 Apr 2025
‘पीएमआरडीए’चा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारकडून रद्द
03 Apr 2025
टेस्लाच्या मोटारी पेटवा!
31 Mar 2025
नियमांचे उल्लंघन करणार्या मद्यविक्री दुकानांचा परवाना रद्द
02 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
अर्थव्यवस्था हेलपाटण्याच्या मार्गावर
2
आरक्षणाचे राजकारण
3
उत्पादन क्षेत्राला ‘आधार’
4
नववर्षाचा सृष्टिसंकेत
5
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
6
‘गीता रहस्य’- शाश्वत तत्वज्ञानाची गंगोत्री