E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
माणिकडोहच्या पाण्याने गाठला तळ
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
पाणलोट क्षेत्राच्या परिसरातील शेतकर्यांची वाढली चिंता
बेल्हे
, (वार्ताहर) : कुकडी प्रकल्पातील धरणाचे हंगामी पाणी आवर्तन पंचवीस दिवस आधीच सुरू झाल्याने, पुणे-अहिल्यानगर जिल्ह्यात मे महिन्यात पाणी टंचाईची चिन्हे आहेत. त्यात यंदा माणिकडोह धरणाने मार्च महिन्यातच तळ गाठला आहे.राजकीय दबावतंत्रामुळे पंचवीस दिवस आधीच यंदा कुकडी प्रकल्पांंतर्गत हंगामी पाणी आवर्तन सुरू केल्यामुळे मे महिन्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. पिंपळगाव जोगा धरणातील पाणी साठ्यात कमालीची घट झाली आहे. माणिकडोह धरणातील पाणी साठ्याची पातळी मंगळवारी ८.५६ टक्के इतकी झाली आहे.
पिंपळगाव जोगा धरणांतील पाणी साठ्याने तळ गाठल्याने, धरणाच्या लाभ क्षेत्रातील जुन्नर, अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील गावांना एप्रिल अखेर पासूनच पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. माणिकडोह धरणाखाली कुकडी नदीच्या किनारी असलेल्या गावातील शेतकर्यांची धरणात कमी पाणीसाठा राहिल्याने चिंता वाढली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील आदिवासी गावात पाणीप्रश्न भेडसावू लागला आहे. माणिकडोह धरणातून सोमवारी सायंकाळी नदीपात्रातील विसर्ग कमी केला असून सध्या ६०० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.
पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार
सद्यस्थितीत उशिरा लागवड झालेले कांदा पीक तसेच उन्हाळी बाजरी, टोमॅटो, व भाजीपाला पिकास पाण्याची गरज आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी पिके शेतात उभी आहेत. विहिरींची पाणी पातळी खोल गेल्यामुळे शेती तसेच जनावरांसाठी देखील पाणी राखून ठेवणे आवश्यक आहे. यंदा पंचवीस दिवस लवकर पाणी आवर्तन सुरू झाल्याने पुढील पाणी आवर्तनानंतर मे महिन्यात जुन्नर, पारनेर तालुक्यातील शेतकर्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे कुकडी डावा कालव्याचे पाणी नियोजन समितीचे सदस्य अशोक घोडके यांनी सांगितले.
योग्य नियोजन गरजेचे
यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता वाढली असल्याने पुढील काही महिन्यांतील शेती व पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. परिसरातील शेतकर्यांना सोबत घेऊन भविष्यात कुकडीच्या पाण्यासाठी आंदोलनरूपी लढा उभारणार असल्याचे खामगावचे उपसरपंच अजिंक्य घोलप यांनी सांगितले.
Related
Articles
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
मोटार वाहन न्यायालयाचा मद्यपींना दणका
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
मोटार वाहन न्यायालयाचा मद्यपींना दणका
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
मोटार वाहन न्यायालयाचा मद्यपींना दणका
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
बंगळुरू-कामाख्या एक्स्प्रेसचे ११ डबे रुळावरून घसरले
30 Mar 2025
बंगल्यात सापडले घबाड
24 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
मोटार वाहन न्यायालयाचा मद्यपींना दणका
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
3
गृहनिर्माण सोसायट्यांना आता फेरविकासासाठी कर्ज
4
बस चालवत मोबाईलवर क्रिकेट पाहणार्या चालकावर कारवाई
5
मार्केटयार्डाला वाहतूक कोंडीचा विळखा
6
इलेक्ट्रिक बसऐवजी सीएनजी बससेवेला प्राधान्य