E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
हार्दीक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे मुंबई इंडियन्सचे नेतृत्व
Wrutuja pandharpure
20 Mar 2025
मुंबई
: आयपीएल २०२५ मधील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसणार आहे. मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मुंबईचं २०२५ च्या आयपीएलमध्ये नेतृत्व करणार्या हार्दिक पांड्याला पहिल्या सामन्यात बॅन करण्यात आलंय. स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पांड्यावर पहिल्या सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलच्या १८ व्या हंगामाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२५ मधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ त्यांचा पहिला संघ २३ मार्च रोजी खेळेल. मुंबईचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्जविरोधात खेळवला जाणार आहे. हार्दिक पांड्या या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे त्यांच्या जागी कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात येणार आहे.
मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात सूर्यकुमार यादव सक्रीय आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच नेतृत्व करेल, असं सांगण्यात येत होतं. अखेर आज त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला. तसे पाहिले तर सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवणे, हा मुंबई इंडियन्ससाठी चुकीचा निर्णय असू शकत नाही. कारण सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे. त्याने २०२३ नंतर २२ सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले.
त्यातील १७ सामन्यांमध्ये विजय मिळवला. टीमला जिंकवून देण्याच्या टक्केवारीचा विचार केल्यास ती ७९.५४ इतकी आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्यावर आयपीएलच्या एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे.या कारणामुळे तो आयपीएल २०२५ चा पहिला सामना खेळू शकणार नाही. त्यामुळेच तो मुंबई इंडियन्सचा कर्णधारही असणार नाही आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यातही तो प्लेईंग इलेव्हनचा भाग नसेल.
आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार होता. या कालावधीत मुंबईच्या संघाने संथ गतीने ओव्हर टाकल्या. त्यामुळे त्याला ३ वेळा दंड ठोठावण्यात आला. जेव्हा कर्णधार पहिल्यांदा असे करतो तेव्हा त्याला १२ लाखांचा दंड ठोठावला जातो. दुसर्यांदा दंड दुप्पट केला जातो आणि तिसर्यांदा असे घडल्यास एका सामन्याची बंदी घालण्यात येते. आयपीएल २०२४ मध्ये ऋषभ पंतवरही स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती.
Related
Articles
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना
28 Mar 2025
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना
28 Mar 2025
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना
28 Mar 2025
धोनी दहा षटके फलंदाजी करू शकत नाही : स्टीफन फ्लेमिंग
01 Apr 2025
आतापर्यंत १०६९ हून अधिक मालमत्तांवर जप्तीची कारवाई
01 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
मोदी यांच्या खासगी सचिवपदी निधी तिवारी
01 Apr 2025
ओला-उबेरला ’आमचा ऑटो’चा पर्याय
01 Apr 2025
विद्यार्थ्यांच्या आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ बडोदाची पीएम-विद्यालक्ष्मी योजना
28 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
2
दोन पोलिस अधिकार्यांना बडतर्फ करणार
3
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू
4
मुळा- मुठा नदीकाठावर वृक्ष लागवडीसाठी दोन कोटी खर्च
5
आनंद गोयल यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
6
सोने-चांदी सतत लकाकताहेत