E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
विधानपरिषदेच्या पाच जागांची पोटनिवडणूक बिनविरोध
Samruddhi Dhayagude
19 Mar 2025
मुंबई : विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारच देण्यात आला नसल्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. महाविकास आघाडीकडून अर्ज न भरल्यामुळे महायुतीचे पाचही उमेदवार विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून जातील
विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक जागा लढवणार आहे. भाजपच्या तिघांची आमदारकीची मुदत मे २०२६ पर्यंत आहे. महायुतीकडून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आलेल्या अर्जांची काल विधिमंडळात निवडणूक अधिकार्यांकडून पडताळणी पार पडली. यामध्ये सर्व अर्ज वैध ठरले. तर एक अपक्ष अर्ज या निवडणुकीत दाखल झाला होता; पण या अर्जावर आमदारांची स्वाक्षरी नसल्यामुळे तो बाद ठरवण्यात आला.
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं संजय खोडके यांच्या नावाची घोषणा केली. विरोधकांकडून कोणताही अर्ज न आल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
विधानपरिषदेची रचना
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेची सदस्यसंख्या ७८ इतकी आहे. विधानसभेप्रमाणे परिषद दर ५ वर्षांनी भंग होत नाही. विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. ७८ सदस्यांपैकी ३० सदस्य विधानसभेच्या आमदारांकडून निवडले जातात. २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींकडून मतदानाद्वारे निवडून दिले जातात. तर, शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातून प्रत्येकी ७ आमदार निवडले जातात.
हे होणार विधानपरिषदेचे आमदार
१. संदीप जोशी (नागपूर, भाजप)
२. संजय केनेकर (छत्रपती संभाजीनगर, भाजप)
३. दादाराव केचे (आर्वी, भाजप)
४. चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार, शिवसेना-शिंदे गट)
५. संजय खोडके (अमरावती, राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट)
Related
Articles
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
अमरावतीच्या विकासासाठी चार हजार तीनशे कोटी मंजूर
07 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’
06 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
अमरावतीच्या विकासासाठी चार हजार तीनशे कोटी मंजूर
07 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’
06 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
अमरावतीच्या विकासासाठी चार हजार तीनशे कोटी मंजूर
07 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’
06 Apr 2025
वक्फच्या जमिनींवर भाजपचा डोळा
04 Apr 2025
वक्फ मंडळ म्हणजे काय?
03 Apr 2025
बुलडोझरने घरे पाडलेल्यांना भरपाई द्या
02 Apr 2025
अमरावतीच्या विकासासाठी चार हजार तीनशे कोटी मंजूर
07 Apr 2025
रांजणगाव येथे व्यावसायिकाची आत्महत्या; तिघांवर गुन्हा दाखल
05 Apr 2025
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पेपरलेस कारभाराला ‘खो’
06 Apr 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
टोकाची संवेदना आणि कायद्याला आव्हान
2
आश्वासनांची ऐशीतैशी (अग्रलेख)
3
नव्या शिक्षण पद्धतीपुढील आव्हाने
4
अधिवेशन झाले, हाती काय आले
5
अखेर स्मार्ट सिटीला कुलूप
6
वंदना कटारियाची आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्तीची घोषणा