E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कास परिसरात महाधनेशचे दर्शन
Wrutuja pandharpure
17 Mar 2025
सातारा
, (प्रतिनिधी) : शहरासह कास परिसरात महाधनेश ऊर्फ गरुड गणेश (ग्रेट पाइड हॉर्नबिल) या पक्ष्याचे दर्शन झाले. या दुर्मीळ, राजबिंड्या पक्ष्याचे दर्शन घडल्याने पक्षिप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जात आहे. महाधनेश पक्ष्याला मराठी मध्ये मलबारी धनेश, गरुड धनेश किंवा राजधनेश नावानेही ओळखतात. हा पक्षी अरुणाचल प्रांतात मुख्यत्वे आढळतो. काळ्या, पिवळ्या आणि पांढर्या तांबूस रंगांचे आकर्षक रूप आणि मोठ्या चोचीमुळे तो लक्ष वेधून घेतो. आपल्याकडे हा पक्षी अभावानेच दर्शन देतो. सातारा शहरात काही ठिकाणी, तर कास पठारावरील पिसाणी येथे तीन महाधनेश पक्ष्यांचे नुकतेच दर्शन घडले.
आपल्याकडे पश्चिम घाटातील घनदाट सदाहरित आणि अर्ध-सदाहरित जंगलांमध्ये आढळतो. उंच झाडावरील विविध प्रकारची फळे त्याचे मुख्य खाद्य आहे. शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून तो आपली आणि उंच झाडाच्या डोलीत बसतो व तेथेच घरटे बांधतो आणि पक्ष्यांना जन्माला घालतो. जैवविविधतेच्या दृष्टीने हा पक्षी महत्त्वाचा समजला जातो. तो बीजप्रसार करण्यास मदत करतो आणि जंगलाच्या पुनरुत्पादनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. मात्र, त्याचा मूळ अधिवास नष्ट होणे आणि शिकार यामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या पक्ष्याचे अधिवास आणि खाद्य स्रोत टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करतात.
सातारा शहर आणि कास परिसरातील पिसाणी येथे महाधनेश या पक्ष्याचे घडलेले दर्शन हे नैसर्गिक अधिवासाच्या दृष्टीने चांगली घटना आहे. याचे आगमन जैवविविधता अधोरेखित करते. या पक्ष्याचे खाद्य कमी होणे हा सर्वांसाठी चिंतेचा विषय आहे. हा पक्षी अन्नाच्या शोधात, प्रजननासाठी आपल्या मूळ अधिवासातून बाहेर आला आहे. महाधनेश आढळला, तर पक्ष्याला त्रास होणार नाही याची काळजी घेत निरीक्षण करावे.
- डॉ. अमित सय्यद, वन्यजीव संशोधक
Related
Articles
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Mar 2025
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक
18 Mar 2025
कायद्याने शिक्षा द्या; घर पाडणे योग्य नाही
15 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Mar 2025
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक
18 Mar 2025
कायद्याने शिक्षा द्या; घर पाडणे योग्य नाही
15 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Mar 2025
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक
18 Mar 2025
कायद्याने शिक्षा द्या; घर पाडणे योग्य नाही
15 Mar 2025
राजकोटमध्ये आगीत होरपळून तिघांचा मृत्यू
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
19 Mar 2025
आयपीएलमध्ये हॅरी ब्रूकवर २ वर्षांची बंदी
15 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न आवश्यक
18 Mar 2025
कायद्याने शिक्षा द्या; घर पाडणे योग्य नाही
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
2
अमेरिकेत मंदीची शक्यता?
3
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
4
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
5
जागतिक प्रदूषणाच्या यादीत भारतातील तेरा शहरे
6
भाच्यावर कारवाई, की धूळफेक