सराव सामन्यात इशान किशनचे शतक   

हैदराबाद : आयपीएल लिलावात काव्या मारनने हैदराबाद संघासाठी विकत घेतलेला इशान किशन जबरदस्त फॉर्मात आहे. इशान किशनने त्याचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीमध्ये खेळला. हा एक सराव सामना होता, जो संघात खेळवण्यात आला.
 
या सामन्यात इशान किशनने ५८ चेंडूत एकूण १३७ धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादच्या इंट्रा-स्क्वॉड सामन्याची खास गोष्ट म्हणजे इशान किशनला  अ संघ आणि ब संघाकडून  दोन्हीकडून फलंदाजीची संधी मिळाली. त्याने आधी अ संघासाठी फलंदाजी केली आणि २८ चेंडूत ६४ धावा करून बाद झाला. त्यानंतर, जेव्हा तो ब संघाविरुद्ध खेळायला आला, तेव्हा तो ३० चेंडूत ७३ धावा करून बाद झाला. इशान किशनने या दोन्ही डावांमध्ये सलामीवीर म्हणून खेळला. त्याने दोन्ही डावांमध्ये ५८ चेंडूत १३७ धावा केल्या.

Related Articles