व्हॉट्सऍप कट्टा   

बनावट कागदपत्राच्या आधारे सदनिका लाटणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला नाशिक सत्र न्यायालयाने स्थगिती दिली. ‘कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती न दिल्यास ते अपात्र ठरु शकतात. पुन्हा निवडणुका झाल्यास लोकांचा पैसा खर्च होईल,’ असे नाशिक सत्र न्यायालयाने म्हटले आहे. यावरुन राज्यभरात अस्वस्थता निर्माण झाली असून समाज माध्यमांवर यासंदर्भात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रतिक्रियांची ही प्रातिनिधिक झलक!  
आपण किती चुकीच्या दिशेने चाललो आहोत. काय बोलायचं तेच कळत नाही. 
 
कोर्ट जर स्वतः म्हणत असेल की माणिकराव कोकाटेंना अपात्र ठरवलं तर, पुन्हा निवडणुका घ्यायला लागतील आणि त्यात जनतेचा पैसा वाया जाईल! तर ध्यानात घ्या, या देशातलं संविधानाचं राज्य संपलंय हे दाखवणारी ही घटना होय. 
 
उद्या जर एखाद्या आमदारानं बलात्कार केला तर त्यालाही शिक्षा देऊ नये, कारण त्याला शिक्षा दिली की तो अपात्र ठरेल आणि पुन्हा निवडणुकीचा खर्च करावा लागेल.
 
उद्या जर एखाद्या मुख्याध्यापकानं दरोडा टाकला एखाद्या घरावर तर त्यालाही बडतर्फ करू नये, कारण नवा मुख्याध्यापक नियुक्त करण्यासाठी जाहीरात द्यावी लागेल आणि त्याचा खर्च जनतेच्याच पैशांमधून करावा लागेल. 
 
मी तर म्हणतो कायद्यातच तशी तरतूद करुन टाका की कोणालाच शिक्षा नको, आणि शिक्षा द्यायचीच नसल्यानं मग न्यायाधीशांचं कामच राहणार नाही. त्यांना निवृत्त करून टाका, म्हणजे किमान लोकांवरचा त्यांच्या पगार, भत्ते, सुविधा यांच्या खर्चाचा बोजा तरी कमी होईल!
---------
मटण नेमके कसे असावे यावर नेत्यांचे गंभीर विचारमंथन
 
औरंगजेब कबर हटवण्यासाठी राज्यस्तरीय मोहिमेची घोषणा
 
आजच्या बातम्या संपल्या....
--------
काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात तर काही दुसर्‍याच्या मनाचा विचार करून जगत असतात आणि दुःख मात्र त्यांनाच मिळतं जे दुसर्‍याच्या मनाचा विचार करून जगत असतात...
 
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोक ठरवितात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
 
घरी आल्यावर मी सहज म्हणालो, 
नर्सने इंजेक्शन टोचले, पण अजिबात दुखले नाही.
ताबडतोब, आतून हिचा आवाज आला, हो, कौतुक तिचे.
आम्ही साधे काही बोललो तरी तुम्हाला टोचते!
---------

Related Articles