आयसीसीच्या संघातून रोहित शर्मा बाहेर   

मुंबई : भारताने १२ वर्षानंतर चॅम्पियन्स चषक  विजेतेपदाचा दुष्काळ अखेर संपवला परंतु या स्पर्धेत सहभागी झालेल्या ८ संघांमधील अनेक खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीने प्रभावित केले. आता या स्पर्धेच्या समाप्तीनंतर आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम संघाची निवड केली. ज्यामध्ये ५ भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या आयसीसी संघात रोहित शर्माला स्थान देण्यात आले नाही. अफगाणिस्तानचे दोन खेळाडू आहेत. ज्यात इब्राहिम झद्रान आणि अझमतुल्लाह उमरझाई यांचा समावेश आहे. मिचेल सँटनरला संघाचा कर्णधार बनवण्यात आले.
 
आयसीसीचा संघ : रचिन रवींद्र, इब्राहिम झद्रान, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ग्लेन फिलिप्स, अझमतुल्ला उमरझाई, मिचेल सँटनर (कर्णधार), महमद शमी, मॅच हेन्री, वरुण चक्रवर्ती.

Related Articles