कोचीतील वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त   

डाव्या पक्षाशी संबंधित विद्यार्थी संघटनेच्या प्रमुखाला अटक 

कोची : केरळमधील कालामस्सरी येथील सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहातून दोन किलो गांजा जप्त करण्यात आला. प्रकरणी विद्यार्थी संघटनेचा सरचिटणीसासह तीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोघांची जामिनावर सुटका झाली आहे. 
 
पोलिसांनी गुरुवारी रात्री वसतिगृहात छापा घातला होता. गांजाप्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक केली.  त्यापैकी दोघांची जामिनावर सुटका झाली असून  कोल्लमच्या कुलथापुझाचा रहिवासी आकाश (वय २१) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याच्याकडून १ किलो ९०९ ग्रॅम गांजा मिळून आला होता. दुसरा गुन्हा अल्लापुझ्झातील हरिपदचा रहिवासी आदित्यन (वय २१)  आणि कोल्लमच्या करुणागपल्लेचा रहिवासी अभिराज (वय २१) यांच्यावर दाखल केला आहे. त्यांच्याकडून ९ किलो ७० ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्यांना न्यायालयाने जामीन दिला आहे, अशी माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. तिघेही गांजा खरेदी आणि विक्रीत सहभागी आहेत. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वसतिगृहात गांजाचा मोठा साठा करुन ठेवल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार थिरीक्काराचे सहाय्यक पोलिस आयुक्त पी. व्ही. बेबी यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने वसतिगृहात छापा घातला होता. प्रकरणात वसतिगृहातील आणि बाहेरील व्यक्तींचा सहभाग असल्याचे छाप्यानंतर अधिकच उघड झाले. त्यामध्ये काही माजी विद्यार्थी देखील सहभागी होते. कारवाईत अमली पदार्थ, दोन मोबाइल संच आणि ओळखपत्रेही जप्त करण्यात आली.  दरम्यान, विद्यार्थी संघटनेचा प्रमुख आणि महाविद्यालयाचा सरचिटणीस आर. अधिराज याला अटक केल्याबद्दल विरोधी पक्ष नेते व्ही. डी. संथेसान यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थी संघटनेचा नेत्याचे आणि अमली पदार्थ विक्रेत्यांशी लागेबांधें आहेत. ही बाब चिंताजनक आहे. डाव्या विचारांची विद्यार्थी संघटना महाविद्यालयात अमली पदार्थाचे रॅकेट चालवत आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी संघटनेचा वापर डाव्या पक्षांकडून केला जात आहे. या घटनेची दखल डाव्या पक्षांनी आणि सत्ताधारी पक्षाने तातडीने घ्यावी आणि संबधितांवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Related Articles