उत्पादन क्षेत्रात २०३० मध्ये चीन जगावर राज्य करेल   

रेनमिन युनिव्हर्सिटीच्या अहवालात करण्यात आला दावा 

बीजिंग : येत्या काही वर्षांत चीन उत्पादन क्षेत्रात जगावर राज्य करणार आहे. चीनच्या बीजिंगच्या रेनमिन युनिव्हर्सिटीने एक अहवाल जारी केला आहे, त्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे, की मेड इन चायना २०२५ पर्यंत चीन स्मार्ट उत्पादन क्षेत्रात जगातील सर्व देशांना मागे टाकेल. सुमारे १० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मेड इन चायना प्रकल्पाचे उद्दिष्ट चीनला एरोस्पेस, इलेक्ट्रिक मोटार, रोबोटिक्स आणि दूरसंचार यासह उच्च तंत्रज्ञान उद्योगांमध्ये सर्वोत्तम बनवणे हे होते.
 
साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, रेनमिन विद्यापीठाचे डीन वांग वेन यांनी सांगितले की, अलीकडच्या काळात जागतिक पातळीवरील विरोध, विशेषत: वेगवेगळ्या धोरणांवरून अमेरिकेसोबत झालेल्या संघर्षानंतरही चीनला अनेक महत्त्वाच्या क्षेत्रात प्रगती साधण्यात मदत झाली आहे. 

चीनची बाजारपेठ सर्वात मोठी असेल

यूएस कन्सल्टन्सीने असा अंदाज वर्तवला आहे, की चीन जागतिक स्मार्ट उत्पादन बाजारपेठेत नेतृत्व करेल. २०३० पर्यंत वार्षिक १८.२ टक्क्यांच्या वाढीसह महसूल १५८.२ बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचेल. 
 
कंपनीच्या म्हणण्यानुसार, दरम्यान, अमेरिकेचा स्मार्ट उत्पादन बाजार २०३० पर्यंत १५२.१ बिलियन अमेरिकी डॉलर्सपर्यंत पोहोचेल. दरवर्षी १३.६ टक्क्यांनी वाढेल. चीनचे पुढील कार्य उत्पादन क्षेत्रात एआयसह नवीन तंत्रज्ञानाच्या एकत्रीकरणाला चालना देणे हे असेल. रेनमिन युनिव्हर्सिटीच्या अहवालात असे म्हटले आहे, की चीनच्या जीडीपीमध्ये डिजिटल अर्थव्यवस्थेचा वाटा ५० ते ६० टक्क्यांपर्यंत वाढेल.
 

Related Articles