जनतेचा विश्वास असलेले सरकार येत नाही, तोपर्यंत पाकिस्तानमध्ये स्थैर्य अशक्य : इम्रान खान   

लाहोर : जोपर्यंत बलुचिस्तानसह संपूर्ण देशात जनतेच्या विश्वासाचे सरकार स्थापन होत नाही, तोपर्यंत पाकिस्तानात स्थिरतेचे वातावरण निर्माण होणार नाही, असे मत पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी व्यक्त केले. 
 
इम्रान खान म्हणाले, लष्करी कारवाया कधीच समस्या सोडवत नाहीत. अगदी मोठ्या युद्धांचे निराकरण शांतता, स्थिरतेसाठी संवाद आणि प्रयत्न करणे महत्त्वाचे असते. बलुचिस्तानमध्ये, दहशतवाद्यांनी ट्रेन हायजॅक करत २१ प्रवाशांची हत्या केली, आणि चार सैनिकांना ओलीस ठेवले. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ यांनी सांगितले, की सुरक्षा दलांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार केले, असे त्यांनी समाज माध्यमावर म्हटले आहे. 
 
पाकिस्तानचे परराष्ट्र धोरण अत्यंत वाईट पद्धतीने हाताळले जात आहे. अफगाणिस्तानची सीमा खूप लांब आहे. त्यांच्यासोबतचे प्रश्न चर्चेने सोडवले पाहिजेत. शेजारी देशांसोबतचे आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्र आणि सार्वभौम असल्याशिवाय आपण देशात शांतता नांदू शकत नाही. 

Related Articles