अबू आझमी यांना न्यायालयाने फटकारले   

मुंबई : समाजवादी पक्षाचे आमदार अबू असीम आझमी यांना येथील न्यायालयाने गुरुवारी जोरदार फटकारले. न्यायालयाने आझमी यांना मुलाखतीदरम्यान संयम बाळगा, अशी स्पष्ट ताकीद दिली. तसेच, तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी अशी बेजाबबदार वक्तव्ये केल्यास दंगल भडकू शकते, असेही न्यायालयाने यावेळी सुनावले.
 
अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.जी. रघुवंशी यांनी नुकताच आझमी यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्याची प्रत काल प्राप्त झाली. आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाची नुकतीच प्रशंसा केली होती. त्यानंतर, आझमी यांच्याविरोधात राज्यात विविध ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत.

Related Articles