अहमदाबाद : गुजरातमधील कच्छ जिल्ह्याला मंगळवारी भूकंपाचे दोन सौम्य धक्के बसले. ३ आणि २.८ रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंप झाल्याचे गांधीनगर येथील इन्स्टिीट्यूट ऑफ सेस्मॉलॉजिकल रिसर्चने स्पष्ट केले. भूकंपामुळे प्राण अथवा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सकाळी ११ वाजता ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचा केंद्र बिंदू पश्चिम- नैऋत्येला रापरपासून १६ किलोमीटरवर होता. एक मिनिटानंतर बछाऊपासून उत्तर -ईशान्य भागात २.८ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. दरम्यान, कच्छ जिल्हा अति उच्च क्षमतेचा भूकंप प्रवण भाग मानला जातो. तेथे कमी क्षमतेचे भूकंप होतच असतात. जानेवारी २००१ मध्ये कच्छमध्ये प्रलयंकारी भूकंप झाला होता. तेव्हा १३ हजार ८०० नागरिकांचा बळी गेला तर १० लाख ६७ हजार जण जखमी झाल होते. मालमत्तेची प्रचंड हानी झाली होती. अनेक शहरे आणि गावे जमीनदोस्त झाली होती.
Fans
Followers