E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
फिनटेक कंपन्यांचा वापर करून फसवणूक करणार्या सहा जणांना अटक
Wrutuja pandharpure
12 Mar 2025
पिंपरी
: इस्टंट पे, एअरपे, स्पाईसमनी या फिनटेक कंपन्यांचा वापर करुन सायबर फ्रॉड करणार्या रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी एअर पेच्या कर्मचार्यासह सहा जणांना अटक करण्यात आली.नरेश सुजाराम चौधरी (घाटकोपर ईस्ट, मुंबई), जिलानी जानी शेख (घाटकोपर वेस्ट, मुंबई) अमित बट्टुलाल साहु व्यवसाय (उरण), इरफान खलील शेख (बंदर रोड, पनवेल), किरण वासुदेव जेठनानी (टिळकरोड, पनवेल), मकरंद संजीव विळेगावकर (आकुर्ली, पनवेल ईस्ट) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एकाची २ लाख ८० हजार रुपयांची फसवुक केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास करीत असताना गुन्हयातील फसवणुकीची रक्कम हस्तांतरित झालेल्या खात्याची माहिती घेतली असता ते इन्फिनिटी इंटरप्रायझेस या नावाने असुन त्यावर मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याचे दिसुन आले. तसेच सदर बँक अकाऊंट वरुन नरेश चौधरी याच्या नावे असणार्या खात्यावर पैसे हस्तांतरित झाल्याचे समोर आले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याला संबंधित अकाऊंटवर संजय नावाच्या व्यक्तीने पैसे पाठवले असल्याचे व ती रक्कम रोख स्वरुपात काढुन फरार आरोपी नाथु याला कमिशनवर देत असल्याचे सांगितले. त्यानंतर नरेश चौधरी याच्याकडे तपास केला असता त्याने नाथु याच्या सांगणेवरुन जिलानी शेख याच्याकडून ८० लाख रुपये नाथु याच्या एअरपेच्या अकाऊंटला घेऊन त्याला रोख स्वरूपात दिल्याचे आढळले. तसेच अटक आरोपी साहु हा अपना मुद्रा नावाने मनी ट्रान्सफर व्यवसाय करुन त्याकरीता त्याचे सिध्दी टेलिकॉम नावाच्या खात्यावर पाहिजे आरोपी नाथु याचेकडुन मोठया स्वरुपात रक्कम घेत असल्याचे दिसुन आले. व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात गौरव्यहार दिसून आल्याने अधिक तपास केला असता अशा वेगवेगळया प्लॅटफॉर्मचा वापर करुन त्याव्दारे मास्टर डिस्ट्रीब्युटर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर असे अकाऊंट तयार करत असे.
वेगवेगळया सायबर गुन्हयातील रक्कम ही म्युल अकाऊंट मार्फत इन्फिनिटी एंटरप्रायझेस अंकाउटवर घेवुन त्यानंतर वरील फिनटेक कंपनीच्या नोडल अकाऊंटवर जमा करत असे. सदर पाँईटच्या बदल्यात सी.एम.एस इन्फोटेक कंपनीकडे जमा होणारी रोख रक्कम पाहिजे आरोपी नाथु हा घेऊन ती आंगडीया मार्फत पाठवुन सायबर फ्रॉड करत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक सागर पोमण, वैभव पाटील, प्रकाश कातकाडे, पोलीस अंमलदार दिपक भोसले, सुभाष पाटील, विशाल निचीत, स्वप्नील खणसे, नितेश बिच्चेवार, अतुल लोखंडे, महेश मोटकर, सुरज शिंदे, सौरभ घाटे, दिपक माने, दिपाली चव्हाण या पथकाने कामगिरी केली.
Related
Articles
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला
15 Mar 2025
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
15 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला
15 Mar 2025
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
15 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला
15 Mar 2025
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
15 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
सरकारच्या कमाईमध्ये पडणार भर
11 Mar 2025
पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला
15 Mar 2025
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
15 Mar 2025
जीएसटी सुटसुटीत हवा; काँग्रेसची केंद्राकडे मागणी
10 Mar 2025
अमिष दाखवून ११ लाखांची फसवणूक
11 Mar 2025
कुलभूषण जाधव अपहरण प्रकरण
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)