ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज तख्त केसगढ साहेबचे जत्थेदार   

अमृतसरच्या अकाल तख्तचा कारभारही पाहणार

चंडीगढ : पंजाबमधील आनंदपूर साहेब येथील तख्त श्री केसगढ साहेबच्या जत्थेदारपदी (मुख्य पुजारी) ज्ञानी कुलदीप सिंग गर्गज यांची नियुक्ती शिरोमणी गुरूद्वारा प्रतिबंधक समितीने सोमवारी केली. त्यांचा पदग्रहण सोहळाही झाला. दरम्यान, त्यांच्या नियुक्तीला निहंग गटाने विरोध केला असून तो खालसा पंथाच्या नियमांप्रमाणे सोहळा झाला नसल्याचा आरोप केला आहे. 
 
शिरोमणी गुरूद्वारा प्रतिबंधक समितीने यापूर्वी दोन जत्थेदारांंची पदावरून हकालपट्टी केली होती. त्यावरून वाद सुरू असताना समितीने गर्गज यांची नियुक्ती जत्थेदारपदी केली आहे. विविध निहंग गटांनी गर्गज यांच्या नियक्तीला विरोध केला आहे. त्यामुळे पदग्रह सोहळा काल सकाळी लवकर घेण्याऐवजी तो दहा वाजता घेण्यात आला. दरम्यान, गर्गज यांनी शिख धर्मीय नागरिकांनी एक व्हावे, असे आवाहन केले आहे. दरम्यान, शिरोमणी गुरूद्वारा प्रतिबंधक समितीने ७ मार्च रोजी गर्गज यांची जत्थेदार पदी (मुख्य पुजारी) म्हणून नियुक्ती करत असल्याची घोषणा केली होती. ते केसरगढ आणि अृमतसर येथील अकाल तख्तचे कार्यकारी मुख्य पुजारी म्हणून काम पाहतील, असे जाहीर केले होते. यापूर्वी समितीने ज्ञानी बागबीर सिंग यांची अकाल तख्तच्या आणि ज्ञानी सुलतान सिंग यांची तख्त केसरगढ साहेबच्या जत्थेदारपदावरून हकालपट्टी केली होती. याबाबचा निर्णय समितीच्या कार्यकारिणीने शिरोमणी अकाली दल आणि अन्य राजकीय नेत्यांच्या संमतीने घेतला होता त्यामध्ये शिरोमणी अकाली दल (एसएडी) चे ज्येष्ठ नेते विक्रम सिंग मजिठिया आणि अन्य राजकीय नेत्यांचा समावेश होता. शिख धर्मीयांच्या परंपरेनुसार तात्पुरता अधिकार असणारे देशात  पाच तख्त आहेत. त्यापैकी दोन अकाल तख्त आणि तख्त केसरगढ साहेब आहेत.
 
दरम्यान, पदगहण करण्यापूर्वी गर्गज हे तख्त केसरगढ साहेब समोर नतमस्तक झाले. ज्ञानी जोगींदर सिंग यांनी शीख प्रार्थना म्हटली. त्यानंतर पंचप्यारांनी गर्गज यांना मानाची पगडी प्रदान केली. या वेळी शिरोमणी गुरूद्वारा प्रतिबंधक समितीचे सचिव प्रताप सिंग आणि तख्त केसरगढ साहेबचे व्यवस्थापक मलकीत सिंग यांनी गर्गज यांना मानाची पगडी तर अन्य ग्रंथींनी त्यांना मानाची अधिकाराची वस्त्रे दिली. 

Related Articles