E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
सिरियात गृहयुद्धाचा भडका
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
दोन दिवसांत एक हजारांहून अधिक मृत्यू, ७४५ जणांवर झाडल्या जवळून गोळ्या
दमिश्क
: सीरियात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तीव्र संघर्ष सुरू आहे. या संघर्षात दोन दिवसांत तब्बल एक हजारांपेक्षा जास्त जण ठार झाले असल्याची माहिती समोर येत आहे. सीरियातील हा संघर्ष गेल्या १४ वर्षांच्या संघर्षातील सर्वात घातक ठरला असल्याचे म्हटले जात आहे. सीरियात सध्या सुरू असलेला हा संघर्ष सीरियन सुरक्षा दल आणि पदच्युत अध्यक्ष बशर अल असद यांच्या समर्थकांमध्ये सुरू आहे.
सीरियन ऑब्झर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्सच्या मते हिंसाचाराचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. काही नागरिकांना गोळ्या घालण्यात आल्या आहेत. या गोळीबारात शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच अनेक ठिकाणी या संघर्षामुळे वीज आणि पाणी खंडित करण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर या संघर्षात आणखी रक्तपात होण्याच्या भीतीने हजारो नागरिक सुरक्षित ठिकाणी पळून गेले, असल्याची माहिती सांगितली जात आहे.
काही महिन्यांपूर्वी बशर अल असद देश सोडून पळून गेल्यानंतर सत्तेवर आलेल्या नवीन सरकारसमोर आता संघर्षाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. दरम्यान, या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सरकारी दलांचे म्हणणे आहे की, बशर अल असदच्या समर्थकांकडून होणार्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला. यामध्ये सूड उगवणार्याही काही घटना घडल्या. काही सुन्नी बंदूकधार्यांनी असदच्या गटाला पाठिंबा देणार्यांना लक्ष्य केले.
काही प्रत्यक्षदर्शींनी या संपूर्ण परिस्थितीच्या भयानक दृश्यांचे वर्णन केले आहे. रस्त्यावर मृतदेह पडले होते आणि घरे जळाली होती. काही माणसांना त्यांची ओळखपत्र तपासल्यानंतर मारले जात होते. या संघर्षाच्या भितीने काही लोक जवळच्या डोंगरात पळून गेले, तर काहींनी ह्मीमिममधील रशियन हवाई तळावर आश्रय घेतला आहे. अद्यापही सीरियात मोठ्या प्रमाणात तणाव आहे. अनेक ठिकाणी लूटमार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात एक हजाराहून अधिक नागरिक मारले गेले आहेत. यापैकी ७४५ नागरिकांपैकी बहुतेकांना जवळून गोळ्या घालून ठार करण्यात आले.
Related
Articles
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
12 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
12 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
12 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
12 Mar 2025
नागरिकांच्या जीवनात गुणात्मक परिवर्तन करून सरकारची प्रतिमा उंचावण्याचे काम करावे : विभागीय आयुक्त
11 Mar 2025
आरटीई प्रवेशासाठी मुदतवाढीची मागणी
10 Mar 2025
बेकायदा शाळा बंद करण्याचा आदेश
12 Mar 2025
अमृतसरमधील मंदिरावर ग्रेनेड फेकले
15 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)