नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी आणखी कमी होईल, असे संंकेत दिले आहेत. त्यावर काँग्रेसने रविवारी भाष्य केलेे. जीएसटी दरात कपात करण्याऐवजी तो सर्वकष कमी केला जावा तसेच जीएसटी २ मध्ये कररचना अधिक सुटसुटीत व्हावी, असे म्हटले आहे.काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितले की, जीएसटी २ चांगला आणि सोपी कररचना असणारा हवा. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत तसा आग्रह पक्षाने धरला होता. आता चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात आहे. सरकार या संधीचा लाभ घेणार का? करात कपात करण्याचे दिलेले आश्वसन म्हणजे पॉपकॉर्न प्रमाणे आहे. जीएसटीची त्री सूत्री रचना आहे. त्यामुळे मूळ ढाच्यात बदल करण्याची गरज आहे.
Fans
Followers