E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीच्या डेपोत खासगी बससाठी जागा देण्याचा विचार
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
पुणे
: शहरातून बाहेरगावी जाणार्या खासगी बस रस्त्यांवर थांबत असल्याने होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी या बस पीएमपीच्या डेपोत ठरवीक वेळेत थांबण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेकडून पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडे (पीएमपीएमएल) पाठविण्यात येणार आहे.शहरातून बाहेरगावी जाणार्या खासगी बस रस्त्यावर थांबतात. त्यामुळे होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी त्यांना पीएमपी डेपोत ठरावीक वेळेत थांबण्यासाठी परवानगी द्यावी, असा प्रस्ताव आहे. शहरातून राज्याच्या कानाकोपर्यात जाणार्या खासगी बस सकाळी, सायंकाळी, तसेच रात्रीच्या वेळी रस्त्यावरच थांबलेल्या असतात. त्यामुळे होणारी कोंडी टाळण्यासाठी महापालिकेने हा प्रस्ताव तयार करून पीएमपी प्रशासनाकडे पाठविण्याचे निश्चित केले आहे.
पुणे हे राज्यातील महत्त्वाचे शहर आहे. त्यामुळे राज्यासह परराज्यातूनही लोक पुण्यात येतात. तसेच जातही असतात. मात्र, या प्रवाशांची वाहतूक करणारी खासगी बस आकाराने मोठ्या असल्याने त्या रस्त्यावरच थांबविल्या जातात. या सर्व खासगी बसचा प्रवास शहरातील वेगवेगळ्या भागांतून होतो. काही बस कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गाने कात्रजवरून स्वारगेटला येतात. त्यानंतर हडपसरवरून सोलापूर, नांदेड, लातूरकडे जातात. तर काही बस गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर, वाकडेवाडी, संगमवाडी, नगर रस्त्यावरून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात जातात. शहरातील प्रमुख रस्त्यांवर प्रवाशांना घेण्यासाठी या बस जागोजागी थांबतात. पौड रस्ता, वाकडेवाडी, शिवाजीनगर, स्वारगेट चौक, नगर रस्त्यावर या बस थांबत असल्याने वाहतूक कोंडी होते.
बाहेरगावी जाणार्या खासगी बसला रस्त्याच्या कडेला उभे राहू न देता, शहरातील मोकळ्या जागांवर थांबण्याची परवानगी दिल्यास ही कोंडी टाळता येईल. शहरात विविध ठिकाणी पीएमपीचे डेपो आहेत. तेथे काही वेळेसाठी या बस थांबण्याची परवानगी द्यावी, असा हा प्रस्ताव आहे. यासाठी महापालिकेकडून ‘पीएमपी’ प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाणार आहे.
Related
Articles
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई
12 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई
12 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई
12 Mar 2025
'डिजिटल अरेस्ट'विरोधात सरकारची कारवाई
14 Mar 2025
मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करणार
12 Mar 2025
एसटी बसमध्ये विनयभंग करणारा जेरबंद
10 Mar 2025
पुणे-बंगळूरू महामार्गावर अपघात, दोन ठार
10 Mar 2025
गौरव आहुजासह मित्राच्या जामीन अर्जावर १७ मार्चला सुनावणी
14 Mar 2025
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा