आयजीआय : अनमोल हिरा   

भाग्यश्री पटवर्धन 

जी रत्ने सोन्यात जडवून विकली जातात त्याचे प्रमाणीकरण आणि अस्सलपणा याचे प्रमाणपत्र देणारी कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट. ब्लॅक स्टोन या कंपनीने इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये हिस्सा खरेदी केली तेव्हापासून ही कंपनी अनेक गुंतवणूकदारांच्या लक्षात आली.हौसेला मोल नसते अशी एक म्हण प्रचलित आहे. त्या म्हणीला पूरक असे प्रतिपादन गेल्या आठवड्यात केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी सोन्याच्या संदर्भात केले. सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या सोन्याचे महत्त्व यापुढील काळात तर राहणारच आहे; पण एक गुंतवणूक साधन म्हणून त्याचे महत्त्व आजही तितकेच आहे असे ते म्हणाले.आजच्या स्तंभाचा विषय थेट सोन्याबाबत नाही; मात्र जी रत्ने सोन्यात जडवून विकली जातात त्याचे प्रमाणीकरण आणि अस्सलपणा याचे प्रमाणपत्र देणारी कंपनी इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट (आयजीआय) या शेअरबाबत आहे. आपण गेल्या आठवड्यात एलआयसीचा विचार केला, तसा आज आयजीआयचा करू.
 
सोन्याच्या दागिन्यात हिर्‍याचे कोंदण ही भारतातील महिला वर्गाची पारंपरिक आवड आणि खासियतही. ब्लॅक स्टोन या कंपनीने इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटमध्ये हिस्सा खरेदी केली, तेव्हापासून ही कंपनी अनेक गुंतवणूकदारांच्या लक्षात आली. कंपनीने प्राथमिक भागविक्री केली, त्यावेळी किंमत पट्टा ३९७ रुपये ते ४१७ रुपये प्रति इक्विटी शेअर ठेवला होता. किमान ३५ शेअरचा अर्ज करावा लागणार होता. ज्यांना या कंपनीचे शेअर मिळाले त्यांना बाजार त्यावेळी वर असल्याने नोंदणीवेळी १५०-२०० रुपये अधिमूल्य मिळाले. हे अर्थात ज्यांनी विक्री केली त्यांना; मात्र असे अनेक गुंतवणूकदार होते ज्यांना आयपीओत हे शेअर मिळाले नाहीत. शेअर बाजाराचे एक वैशिष्ट्य असे की, तो सातत्याने संधी देत असतो; मात्र ती नेमक्या वेळी हेरता येणे महत्त्वाचे असते. इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट कंपनी नेमके कोणते काम करते याबाबत आपण याच स्तंभात माहिती घेतल्याचे आठवत असेल. कंपनी वेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे हे स्पष्ट होते. १) गेल्या दोन-तीन वर्षात सोने-चांदीचे दागिने, हिरे यांच्या खरेदीसोबत त्याचा दर्जा सांगणारे किंवा सिद्ध करणारे प्रमाणपत्र देणे अनिवार्य झाले आहे. हे प्रमाणपत्र देणारी जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट देशातील सर्वात मोठी आणि जगातील दुसर्‍या क्रमांकाची आहे. २) हिरे आणि दागिने प्रमाणपत्र व्यवसायात ५० टक्के हिस्सा आयजीआयचा आहे. ३) प्रयोगशाळेत तयार केल्या जाणार्‍या हिर्‍यांच्या प्रमाणीकरण व्यवसायात जागतिक बाजारात ६५ टक्के हिस्सा आहे. ४) कंपनीच्या दहा देशांत ३१ प्रयोगशाळा आणि सहा देशांत १८ हिरे पैलू प्रशिक्षण केंद्र आहेत. ५) गेली ५० वर्षे ही संस्था कार्यरत आहे.
 
सध्याची स्थिती पाहता जागतिक अनिश्चिततेमुळे आणि अमेरिकेच्या आक्रमक व्यापार धोरणामुळे डॉलर मजबूत तर रुपया दुबळा होतो आहे. अशा वेळी सामान्य नागरिकांपासून रिझर्व बँकेपर्यंत सोने खरेदीसाठी स्पर्धा लागलेली दिसते. ज्या लोकांनी दोन किंवा तीन वर्षे आधी सोन्याची खरेदी किंवा दागिने घेतले असतील, त्याच्या विक्री मूल्यात मोठी वाढ झालेली दिसेल. अनेकदा सोन्याचा किंवा दागिन्यांचा ग्राहक दागिना मोडीत घालत नाही, तर त्यात भर किंवा नवा दागिना करतो. आता या कंपनीची तिमाही कामगिरी पाहू. नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कंपनीचा निव्वळ नफा १४ टक्के वाढला आहे. ११४ कोटी रुपये नफा मिळाला असून, गेल्या वर्षीच्या तिमाहीत तो ७८ कोटी रुपये होता. दागिने प्रमाणपत्र घेणे ग्राहकांसाठी महत्त्वाचे अशासाठी की, त्याचा वापर संबंधित वस्तू गहाण ठेवताना हमीपत्र म्हणून करता येऊ शकतो, तसेच त्या दागिन्यांचे मूल्य निर्धारण करण्यासही त्याचा वापर होतो. प्रमाणपत्राबाबत जितकी जाणीव वाढेल, तितका कंपनीचा व्यवसाय वाढत जाणार आहे. कमाल किमान भाव (५२-ुज्ञ हळसह ६४२.३० ५२-ुज्ञ श्रेु ३१८.००) असा आहे. 
 
क्रूड तेल आणि नफा
 
गेल्या आठवड्यात जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव घसरून प्रतिपिंप ७० डॉलर पेक्षा कमी झाले. रशिया युक्रेन युद्ध थांबेल अशी चिन्हे दिसत आहेत. तेल किंमती कमी झाल्याचा फायदा देशाला मिळतोय. मात्र तेल विपणन कंपन्यांचा नफा चांगला वाढेल अशी अपेक्षा आहे.म्हणजे बीपी सीए ल एच पीसी एल, रिलायन्स यांचा नफा वाढणार .पेट्रोल डिझेल भाव कमी झाल्यास त्याचा फायदा सर्व क्षेत्रांना होईल.सध्या तेल विपणन कंपन्यांचे शेअर आकर्षक भाव दाखवत आहेत. 

Related Articles