E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संत तुकाराम कारखाना संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ अर्ज
Wrutuja pandharpure
10 Mar 2025
तळेगाव दाभाडे (वार्ताहर)
: श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर पाच गटांमध्ये सर्वांधिक ४७ अर्ज हे सोमाटणे-पवनानगर या गटातील तीन जागांसाठी दाखल झाले असून इतर मागासवर्ग एका जागेसाठी तब्बल ३७ अर्ज आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी दिली.
कारखाना संचालक मंडळाची निवडणूक ५ एप्रिल रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुक्रवारी शेवटचा दिवस होता. संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी एकूण २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये ऊस उत्पादक गट क्रमांक १ हिंजवडी-ताथवडे या गटातील ३ जागांसाठी २३ अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक २ पौड-पिरंगुट या गटातील ३ जागांसाठी १८ अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक ३ तळेगाव-वडगाव या गटातील ३ जागांसाठी २९ अर्ज, ऊस उत्पादक गट क्रमांक ४ सोमाटणे पवनानगर या गटातील तीन जागांसाठी ४१ अर्ज,
ऊस उत्पादक गट क्रमांक ५ खेड-शिरूर-हवेली या गटातील चार जागांसाठी ३७ अर्ज, महिला राखीव दोन जागांसाठी २३ अर्ज, अनुसूचित जाती/जमाती एका जागेसाठी ९ अर्ज, इतर मागासवर्ग एका जागेसाठी ३७ अर्ज व विमुक्त जाती/भटक्या जमाती/विमाग्र एका जागेसाठी ९ अर्ज असे एकूण २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.दाखल झालेल्या उमेदवारी अर्जाची छाननी आज होणार असून, अर्ज मागे घेण्यासाठी २५ मार्चपर्यंत मुदत आहे. दरम्यान, २२६ उमेदवारी अर्ज दाखल झाले असले तरी काही उमेदवारांनी दोन-दोन अर्ज भरले असल्याने प्रत्यक्षात उमेदवारांची संख्या सुमारे २००च्या आसपास आहे. २५ मार्च रोजी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशीच निवडणुकीचे खरे चित्र समोर येणार आहे.
नवले, भेगडे, दाभाडे, शेळके यांच्या अर्जामुळे चर्चेला उधाण
उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये प्रामुख्याने कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विदुरा ऊर्फ नानासाहेब नवले, उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्यासह बहुतांश विद्यमान संचालक तसेच मावळचे आमदार सुनील शेळके, ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे यांच्यासह अनेक दिग्गज कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने निवडणुकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात असून चर्चेला उधाण आले आहे.
Related
Articles
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
ब्रिटनच्या अधिकार्यांची हकालपट्टी
11 Mar 2025
ग्राहकाकडून सेवा शुल्काची वसुली करणार्यास रेस्टॉरंट चालकांना दणका
14 Mar 2025
जेजुरीत खंडोबा मंदिरातही आता वस्त्रसंहिता!
11 Mar 2025
टिळकवाड्याचा उलगडला इतिहास
10 Mar 2025
शहबाज शरीफ यांची बलुचिस्तानला भेट
14 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
12 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा