व्हॉट्सऍप कट्टा   

भावना
 
तुझ्याशी नाते जडले
गुंतत गेले
अक्षरशः भावनेच्या भरात
गुरफटत गेले. 
आता दुसरं-तिसरं काही
उरलचं नाही, 
माग परतणं, वळून बघणं
जन्मात नाही
भंगलेल्या मनाने
पाला पाचोळ्यासारखं
वाट फुटेल तिथं 
वाहवत जाणं इतकचं
फक्त पुढे निघालाय तो काळ
पण माझं हरवलयं जग
राहिल्यात फक्त यातना
भळभळत्या जखमातून
भिजलेल्या शरीरात
शोधायच्या फक्त भावना...
 
- वैशाली कोटणीस, गंधर्वनगरी, तापकीरनगर, मोशी,
मो : ९१३०९३०५२९.
---------
यशाची खरी किंमत त्यात गमावलेल्या गोष्टीत असते, कारण प्रत्येक यशाला काही न काही किमत चुकवली असते. यश मिळवण्यासाठी आपल्या जीवनातील अनेक गोष्टींमध्ये बदल घडवावे लागतात - काही वेळा वेळ, काही वेळा ऊर्जा, कधी कधी नातेसंबंध आणि कधी कधी स्वतःसाठी घालवलेला व्यक्तीगत वेळ.
जेव्हा आपण यशाकडे जातो, तेव्हा आपल्याला किती गोष्टी त्यागाव्या लागतात, हे आपल्याला समजून येतं. हे त्याग, गमावलेली गोष्टी किंवा त्यात दिलेला कष्टांचा परिष्कारच आपल्याला खरे यश प्राप्त करायला मदत करतो.
यश मिळवण्यासाठी ज्या गोष्टी गमावल्या, त्या गोष्टी आपल्याला अजून अधिक समृद्ध बनवतात. जरी आपण यश प्राप्त केलं तरी, त्यातल्या गमावलेल्या गोष्टींचं मोल लक्षात घेतल्याने आपल्या यशाची खरी शुद्धता समजते.
खरं तर, यश त्यागाची प्रक्रिया असते - ज्यामुळे आपल्याला अधिक शहाणं, अनुभव घेणं आणि अधिक सुसंस्कृत बनवते. यश मिळवताना आपण काय गमावलं आहे हे तपासलं की, ते एक ठराविक मार्ग आणि शहाणपण देतं, जे आपल्याला त्या यशाच्या मागे दडलेली गोडी समजायला मदत करतं.
---------
मन्या : जन्या, तुला मोबाइलचा सर्वात मोठा फायदा माहीत आहे का?
जन्या : कोणता फायदा आहे?
मन्या : मोबाइलचा सर्वात मोठा फायदा हा झाला आहे की,
कामधंदा नसलेल्यांना वाटतं की ते बिझी आहेत.

Related Articles