औरंगजेबाची कबर जेसीबीने उखडून टाका   

उदयनराजेंचा संताप 

सातारा : औरंगजेब चोर होता, तो देश लुटायला आला होता. जे त्याच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतात, त्यांनी ती कबर घेऊन घरी जावे अन्यथा देश सोडून जावे. आता औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. त्याची कबर जेसीबीने उखडून टाका, असा संताप खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केला.  
    
पत्रकार परिषद ते बोलत होते. उदयनराजे म्हणाले, जर कायदा झाला तर कोणी महाराजांबाबत बोलायचे धाडस करणार नाही. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सरकारमान्य संपूर्ण खंड पद्धतीने प्रकाशित करावा. त्यामुळे इतिहासावरून जो वादविवाद सुरू आहे तो संपुष्टात येईल. आज कोणीही काहीही लिहितो, काल्पनिक चित्र रंगवतो या विरोधात सरकारने कायदा आणला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांना खरेच तुम्ही दैवत मानत असाल तर महाराष्ट्राच्या जनतेला दाखवून द्या, याच अधिवेशनात तुम्ही कायदा मंजूर करा अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडून जाईल. 

Related Articles