जामनगर : जागतिक वन्यजीव दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जामनगरमध्ये उभारलेल्या वन्यजीव संरक्षण केंद्र ‘वनतारा’चे उद्घाटन केले. वन्यजीव संरक्षण व संवर्धनासाठी समर्पित असलेल्या या केंद्रात त्यांनी बराच वेळ घालवला आणि प्राण्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधांची पाहणी केली. वनतारा ही प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आली आहे.वनतारात आगमन होताच अंबानी कुटुंबाने पारंपरिक पद्धतीने पंतप्रधानांचे स्वागत केले.पंतप्रधानांनी प्राण्यांसाठी खास तयार करण्यात आलेल्या मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटलची पाहणी केली. त्यांनी तिथे सीटी स्कॅन, चठख, अल्ट्रासाऊंड आणि एंडोस्कोपी यांसारख्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पाहिले. प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या खउण आणि ऑपरेशन थिएटरलाही त्यांनी भेट दिली. येथे नव्याने जन्मलेल्या प्राण्यांच्या देखभालीसाठी खास नर्सरीही तयार करण्यात आली आहे. पंतप्रधानांनी आशियाई सिंहाचा बछडा , पांढर्या सिंहाचे बछडा आणि अत्यंत दुर्मिळ क्लाऊडेड बिबट्या शावकांचे निरीक्षण केले. त्यांनी स्वतःच्या हातांनी पांढर्या सिंह, बाघ आणि गेंड्याच्या बछड्याना दूध पाजले. येथे आशियाई सिंह, हिम बिबट्या आणि एकशिंगी गेंडा यांसारख्या दुर्मिळ प्राण्यांचे संवर्धन केले जाते. वनताराचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘गजनगरी’, जी सुमारे १००० एकरमध्ये पसरलेली आहे.
Fans
Followers