E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पीएमपीतर्फे महिलांसाठी मोफत बस सेवा
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
जागतिक महिला दिनानिमित्त निर्णय
पुणे
: जागतिक महिला दिनानिमित्त पुण्यात पीएमपी प्रशासनाने महिलांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या दिवशी महिलांना मोफत बस सेवा दिली जाणार आहे. शहरातील प्रमुख १३ मार्गावर १५ महिला विशेष बस धावणार आहेत. या निर्णयामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून या दिवशी महिलांना दिवसभर मोफत बस प्रवास करता येणार आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडतर्फे (पीएमपी) जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून महिलांसाठी मोफत बसे सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ८ मार्च २०१५ रोजी महिलांना पीएमपीच्या महिला विशेष बसमध्ये मोफत बस सेवा करता येणार आहे. महिलांना प्रवासाची अधिक सोय व्हावी आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सुलभ व्हावी, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पीएमपीच्या स्वारगेट, न. ता. वाडी, कोथरूड, कात्रज, हडपसर, अप्पर, पुणे स्टेशन, निगडी, पिंपरी आणि भोसरी या आगारांतून तेजस्विनी महिला बसमधून ही मोफत बस सेवा दिली जाणार आहे. दिवसभर जवळपास ४२ फेर्या होणार आहेत. त्यामुळे महिला प्रवाशांना तत्काळ आणि मोफत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकाही मार्गावर बस बंद न ठेवता सेवा सुरळीपणे सुरू राहावी, अशा सूचना सर्व आगार व्यवस्थापकांना देण्यात आल्या आहेत.
महिलांच्या तेजस्विनी बसमध्ये महिला वाहक सेवकांची नेमणूक करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे. आगार प्रमुखांनी मुख्य मार्गावरील बस स्थानकावर उपस्थित राहून महिलांना गुलाब पुष्प देऊन त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा द्याव्यात, तर या बसमधून केवळ महिला प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना सुध्दा पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
महिला बसचे मार्ग आणि फेर्या
स्वारगेट ते हडपसर - ५
कोथरूड डेपो ते पुणे स्टेशन - २
स्वारगेट ते धायरेश्वर मंदिर - २
एनडीए गेट ते मनपा - २
कात्रज ते महाराष्ट्र हौसिंग बोर्ड - ७
कात्रज ते कोथरूड डेपो - ६
हडपसर ते वारजे माळवाडी - २
भेकराईनगर ते मनपा - २
मार्केट यार्ड ते पिंपळे गुरव - २
पुणे स्टेशन ते कोंढवा खुर्द - २
निगडी ते मेगा पॉलीस हिंजवडी - ४
भोसरी ते निगडी - ४
चिखली ते डांगे चौक - २
Related
Articles
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात
15 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
रक्तरंजित संघर्ष (अग्रलेख)
18 Mar 2025
पंजाबमध्ये युट्यूबरच्या घरावर बॉम्ब हल्ला
17 Mar 2025
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात
15 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
रक्तरंजित संघर्ष (अग्रलेख)
18 Mar 2025
पंजाबमध्ये युट्यूबरच्या घरावर बॉम्ब हल्ला
17 Mar 2025
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात
15 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
रक्तरंजित संघर्ष (अग्रलेख)
18 Mar 2025
पंजाबमध्ये युट्यूबरच्या घरावर बॉम्ब हल्ला
17 Mar 2025
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 Mar 2025
आयपीएलला २२ मार्चपासून सुरुवात
15 Mar 2025
जन्माने नागरिकत्व अटी तत्त्वत: स्वीकाराव्यात
15 Mar 2025
रक्तरंजित संघर्ष (अग्रलेख)
18 Mar 2025
पंजाबमध्ये युट्यूबरच्या घरावर बॉम्ब हल्ला
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
अमेरिकेत मंदीची शक्यता?
6
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी