E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा .
Wrutuja pandharpure
07 Mar 2025
बुद्धीच सर्वश्रेष्ठ
दोन व्यक्ती आपसात भांडत होत्या. एकजण धनाला तर दुसरा बुद्धीला सर्वश्रेष्ठ म्हणत होता. काहीच मार्ग निघत नाही हे पाहून दोघेही देशाच्या राजाकडे गेले आणि न्याय मागू लागले. राजाही काही निर्णय घेऊ शकला नाही. त्याने एक पत्र देऊन त्या दोघांना रोमच्या सम्राटाकडे पाठविले. जेंव्हा दोघांनी ते पत्र रोमच्या सम्राटाला दिले तेंव्हा त्यातील गोम ओळखून त्याने त्या दोघांना फाशी देण्याची आज्ञा केली. हे ऐकताच दोघांनीही एकमत करण्याचे ठरविले. बुद्धिवानाने धनवानास म्हंटले, तू समजतोस धन मोठे आहे तर धनाने आता आपल्या प्राणांची रक्षा कर बघू. धनवानाचे प्रयत्न कामी आले नाहीत. त्याने हार पत्करत बुद्धिवानास प्राण रक्षण करण्याची विनंती केली. बुद्धिवान म्हणाला फाशीवर चढताना आपण एकमेकांस पुढे ढकलायचे, पुढील गोष्ट मी सांभाळून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी केले. प्रथम फाशी जाण्यासाठी दोघे धक्काबुक्की करू लागले तेंव्हा रोमच्या सम्राटाने कारण विचारले. बुद्धिवान म्हणाला, आमच्या राजाला ज्योतिष्याने सांगितले आहे, मी जेथे मरेन तेथे भयंकर दुष्काळ पडेल आणि माझा मित्र जेथे मरेल तेथे महामारी पसरेल.
त्यामुळे मी मरण्याचा विचार करतो कारण लाखो लोक महामारीपासून बचावतील. आम्हाला फाशी तर आमच्या देशातही देता आली असती; पण आमच्या राजाने देशावरचे संकट तुमच्या पदरात टाकले आहे. आता कुणाला फाशी देता ते सांगा? त्या बरोबर रोमच्या सम्राटाने दोघांची सजा माफ केली. अशा प्रकारे बुद्धीवानाने धनवानाचा जीव स्वतः बरोबर वाचविला.
तात्पर्य
: बुद्धी ही सर्वश्रेष्ठ आहे.
---------
तणाव आणि दबाव हे जीवनाचा एक अपरिहार्य भाग आहेत. जेव्हा आपल्याला यशाच्या काठावर पोहोचायचं असतं, तेव्हा तणाव आणि आव्हाने यांचा सामना करावा लागतो; पण या तणावांवर कसा नियंत्रण ठेवायचं, हेच खर्या यशाचं गुपित असतं.
तणाव हे आपल्याला एक प्रकारे परीक्षा देतं. जर आपल्याला यशाच्या उंचावर उभं राहायचं असेल, तर आपल्याला त्यातील दबाव, ताण, आणि चढउतार सांभाळता येणं आवश्यक आहे. यश आणि तणाव ह्यांचा संबंध असा आहे की, जेव्हा आपण तणावाला समजून घेतो आणि त्यावर योग्य पद्धतीने प्रतिक्रिया देतो, तेव्हा आपल्याला अधिक स्थिर आणि दृढ बनवते.
ज्यावेळी आपल्याला तणावाचं प्रमाण वाढतं, त्यावेळी शांत राहणं, मनाशी समजूत घालणं आणि शांतपणे निर्णय घेणं हेसुद्धा यशाच्या दिशेचं महत्त्वाचं अंग आहे. तणावाच्या वेळी आपली मानसिक शक्ती, धैर्य, आणि तत्त्वज्ञान या गोष्टी आपल्या सर्वांत मोठ्या सहाय्यक ठरतात.
जेव्हा आपण तणावाशी लढा न देण्याऐवजी त्याच्याशी सामंजस्य साधून त्यावर नियंत्रण ठेवतो, तेव्हा आपण केवळ यशच नाही, तर ते यश सांभाळण्याची आणि अधिक ठामपणे उभं राहण्याची क्षमता मिळवतो.
---------
बायको : अहो, मला एक सरप्राईज पाहिजे.
नवरा : मिळेल गं...
बायको : काय?
नवरा : तुझ्या वाढदिवशी मी तुला सांगणारच नाही की तुझा वाढदिवस आहे!
---------
रात्री तो लेकाच्या खोलीत गेला. वाटीतून आणलेलं खोबरेल तेल त्याने, लेकाच्या गालावर अगदी हलक्या हाताने चोळलं. अजूनही त्याची बोटं उमटलेली दिसत होती, गाढ झोपलेल्या लेकाच्या गालावर.
ऑफिसमधून येतच होता तो की... गेटवर त्याला कंप्लेंट आली होती त्याच्या लेकाबद्दल, त्याने आज केलेल्या मारामारीची. बिल्डिंगमधल्याच एका मुलाचा, शर्ट फाटला होता त्यात. डोक्यात राग घेऊनच तो घरी आला. आणि नेहमीप्रमाणे जेव्हा लेकाने पाणी आणलं त्याला, तेव्हा ते उडवत... दोन थोबाडीत दिल्या होत्या ठेऊन त्याने लेकाच्या. लेक काहीही न खाता पिताच, झोपी गेला होता मग.
फक्त आठवीत आहे हा. इतक्या लहान वयात मारामारीची रग, येतेच कुठून अंगात मी म्हणतो. गुंड होणारेय का हा, मोठा झाल्यावर?. स्वागत सुरु होतं... अस्वस्थ होऊन चुळबूळ करत, सोफ्यावर बसलेल्या त्याचं. त्याची बायको येऊन बसली त्याच्या जवळ, आणि पाठीवरुन हात फिरवत म्हणाली त्याला...
कोणा मुलाला इतका बेदम चोप द्यायची रग, कुठून बरं आली आपल्या अवघ्या तेरा वर्षांच्या लेकात? हा खरंच गंभीर प्रश्नच आहे; पण मग आणिक एक प्रश्न पडायला हवा होता अरे तुला. जो तुला पडलेलाच नाहीये, कारण पूर्ण सत्य तुझ्या कानांवर आलेलंच नाही आणि तो दुसरा प्रश्न म्हणजे... फक्त आठवीतल्या आपल्या लेकाला, एखाद्या मुलीच्या शीलाचं रक्षण करण्याची समज तरी... नेमकी कुठून आली? एखाद्या कोणाला मारणं, हा त्याने शोधलेला उपाय होता अरे... त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या समस्येचा आणि तुला फक्त त्याने अवलंबलेला उपायच कळला... त्याआधी त्याने केलेलं, त्या समस्येचं निवारण नाही समजलं. तर आता ते ही ऐक. त्याच्याच वर्गातली बाजूच्या विंगमध्ये रहाणारी एक मुलगी, सायकल चालवतांना चांगलीच पडली... आणि सरपटतच पुढे गेली. तिचा ड्रेस पूर्णपणे फाटला आणि तिची अंडर गारमेंट्स दिसू लागली त्यातून. तेव्हा तिला उठून उभं रहाण्यासाठी दिलेला, तिच्याच विंगमध्ये राहाणार्या त्या दोघांचा मदतीचा हात... तिच्या अंगाच्या नको त्या भागांवरुन फिरु लागला. ती बावरुन प्रतिकार करु लागली; पण दहावीतल्या त्या दोन मुलांपुढे... काय चालणार होतं तिचं एकटीचं? तेव्हा आपला हा लेक, एकटा भिडला त्यांना. अरे तू जाणतोसच हा इतका लाजाळू आहे की, घरीही उघडा बसत नाही आपल्यासमोर; पण याच आपल्या लाजाळू लेकाने, स्वतःचा टी-शर्ट काढून त्या मुलीला घालायला देत... तिची लाज झाकली आणि मग आधी बोला-चालीवरुन हमरी-तुमरीवर येत, झाली मारामारीला सुरुवात त्यांच्यात. सिक्युरिटी वाल्यांनी मध्ये पडत, सोडवली मग मारामारी कशीबशी. त्या दोन मुलांपैकी एकाचा शर्ट फाटला, ते तुला सांगितलं कोणीतरी; पण आपल्या लेकाच्या उघड्या अंगावर, उठलेल्या वळांबद्दल बोललं का कोणी तुला? तू यायच्या अगदी तासभर आधी, त्या मुलीचे आई - बाबा आले होते आपल्याकडे. फक्त हात जोडले दोघांनी मला दारातूनच आणि निघून गेले ते वाहणार्या डोळ्यांनी. आपल्या लेकाचा तो टी-शर्ट, घट्ट धरला होता छातीशी त्या बाईंनी; पण त्यांनी तो दिला नाही मला आणि मी मागितलाही नाही. आपल्या घरचा तो साध्यातला टी-शर्ट... त्यांच्यासाठी कदाचित अमुल्य ’ठेवा’ झाला होता, जपून ठेवावा असा.
हे सगळं डोक्यात घोळतंच होतं त्याच्या की, लेकाने कूस बदलली. झोपेत सदरा वर झाल्यामुळे उघड्या पडलेल्या लेकाच्या पाठीवर, लाल - जांभळे वळ दिसले त्याला. त्याने मग दाटलेल्या गळ्यानेच बायकोला हाक मारत, वाटीत आणिक थोडं तेल घेऊन यायला सांगितलंं.
----------
Related
Articles
जैद टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई
17 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर
11 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मार्क कार्ली बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान
15 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
जैद टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई
17 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर
11 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मार्क कार्ली बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान
15 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
जैद टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई
17 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर
11 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मार्क कार्ली बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान
15 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
जैद टोळीवर मकोकाअंतर्गत कारवाई
17 Mar 2025
न्यूझीलंडचे पंतप्रधान १६ मार्चला भारत दौर्यावर
11 Mar 2025
लिबरल पक्षाच्या नेतेपदी मार्क कार्नी
11 Mar 2025
मार्क कार्ली बनले कॅनडाचे नवे पंतप्रधान
15 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?