ट्रम्प यांची पुतीन, झेलेन्की यांच्याशी चर्चा   

वॉशिंग्टन : निवडणुकीत युक्रेन-रशिया युद्ध थांबवण्याचे आश्वासन देणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्याची, माहिती पत्रकार परिषदेत दिली. ट्रम्प म्हणाले, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून प्रदीर्घ आणि सकारात्मक चर्चा झाली.  पुतीन यांच्यासोबत जवळपास दीड तास चर्चा केली. पुतीन आणि झेलेन्स्की यांच्यासोबत युद्ध विराम करण्याच्या मुद्द्यावर बोलणे झाले. याबाबत पुतीन यांच्या शिष्टमंडळासोबत तत्काळ बैठक घेण्यावर सहमती झाली आहे. ही बैठक सौदी अरेबियात होईल. युक्रेनेमध्ये निवडणूक होण्याची गरज असल्याचेही डोनाल्ड ट्रम्प यावेळी यांनी सांगितले.
 
ट्रम्प यांना रशिया दौर्‍याचे निमंत्रण
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी अशी माहिती दिली, की ट्रम्प आणि पुतीन यांच्यात प्रदीर्घ चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या देशांना भेटी देण्याबद्दल सहमती दर्शवली. पुतीन यांनीही डोनाल्ड ट्रम्प यांना रशियाच्या दौर्‍याचे निमंत्रण दिले. 
 
झेलेन्स्की काय म्हणाले?
ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या चर्चेबद्दल झेलेन्स्की म्हणाले, माझी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत बोलणी झाली. दोन्ही देश मिळून रशियाच्या आक्रमणाला रोखण्याबद्दल, तसेच स्थिर, विश्वसनीय शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात पुढे कशी पावले टाकण्यासंदर्भात आराखडा तयार करत आहेत, असे झेलेन्स्की म्हणाले. 

Related Articles