बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजपची सत्ता येणार : प्रधान   

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचीच सत्ता येईल, असा दावा केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी केला. ममता बॅनर्जी सरकार पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अडथळे आणत असल्याचा आरोपही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना धमेंद्र प्रधान म्हणाले, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने पश्चिम बंगालमध्ये ४२ पैकी १८ जागा जिंकून आपला ठसा उमटवला. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही ७७ आणि २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकसभेच्या १२ जागा जिंकल्या. २०१९ पासून भाजपची मतदानाची टक्केवारी ३०-४० टक्क्यांच्या आसपास आहे. पक्षाला आणखी १० टक्के मते मिळाली तर आम्ही ममता बॅनर्जी सरकारला सत्तेवरून हटवू. २०२६ मध्ये राज्यात आमचीच सत्ता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles