E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पवना धरणात ६४ टक्केपाणीसाठा
Wrutuja pandharpure
10 Feb 2025
पिंपरी
: उन्हाचा चटका वाढला असून, पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणार्या मावळातील पवना धरणातील पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. सध्या ६३.९२ टक्के पाणीसाठा असून, हा पाणीसाठा १५ जूनपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
शहराला मागील साडेपाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. शहराची लोकसंख्या वाढत असल्यामुळे पाण्याची मागणीही सातत्याने वाढू लागली आहे. मावळातील पवना धरणातून ५१०, आंद्रा धरणातून ८०, एमआयडीसीकडून २० असे ६१० दशलक्ष लीटर (एमएलडी) एका दिवसाला शहराला पाणी पुरवठा केला जात आहे. भामा आसखेड धरणातून १६७ दशलक्ष लिटर पाणी आणण्याचे नियोजन आहे. त्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या कामाला वेग आला असून, डिसेंबर २०२५ अखेर या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याचा मानस महापालिका प्रशासनाचा आहे.
मागील काही दिवसांपासून शहर आणि मावळातील पवना धरण परिसरात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. पाण्याची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. उन्हामुळे बाष्पीभवनही होत आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी घटू लागली आहे. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासह महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायत व नगरपरिषदेला पाणी दिले जाते. सध्या पवना धरणात ६३.९२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत धरणात ६२.९१ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा गतवर्षापेक्षा १.१ टक्के इतका अधिक पाणीसाठा धरणात शिल्लक असून, शहरवासीयांना सध्यातरी पाण्याची चिंता नाही. दरम्यान, आंद्रा धरणातूनही महापालिका पाणी घेत असून, या धरणात ६५ टक्के पाणीसाठा आहे.
पवना धरणात ६३.९२ टक्के पाणीसाठा आहे. हा साठा १५ जुलैअखेरपर्यंत पुरेल. उन्हाचा चटका वाढू लागला आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते. त्यामुळे नागरिकांनी आतापासून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पवना धरणाचे शाखा अभियंता रजनीश बारिया यांनी केले.
Related
Articles
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमेरिकेत चक्रीवादळात ३४ जणांचा मृत्यू
17 Mar 2025
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमेरिकेत चक्रीवादळात ३४ जणांचा मृत्यू
17 Mar 2025
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमेरिकेत चक्रीवादळात ३४ जणांचा मृत्यू
17 Mar 2025
दत्ता गाडेच्या अडचणीत आणखी वाढ होणार
15 Mar 2025
अशांत मणिपूरमध्ये सरकारचा बातम्या, भाषणांवर भर : गोगोई
12 Mar 2025
चॅम्पियन चषकाच्या विजयानंतर भारतीय संघाचे अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन
11 Mar 2025
अमेरिकेत मंदीची शक्यता?
12 Mar 2025
आकाशगंगांच्या अभ्यासासाठी नासाची दुर्बीण झेपावली
14 Mar 2025
अमेरिकेत चक्रीवादळात ३४ जणांचा मृत्यू
17 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
4
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)
5
जिल्हा पर्यटन विकास आराखडा युद्धपातळीवर तयार करा : जिल्हाधिकारी
6
अमेरिकेत मंदीची शक्यता?