E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही : मुख्यमंत्री फडणवीस
Wrutuja pandharpure
09 Feb 2025
पुणे
: लाडकी बहीण योजनेत कोणताही नवीन निकष नाही. काही बहिणींनी त्या निकषाबाहेर गेल्या असल्याने त्यांनी योजनेचा लाभ घेणे सोडले. आम्ही कोणाचेही पैसे परत घेणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
पुणे दौर्यात हिंदू गर्जना केसरी स्पर्धेच्या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी पत्रकार परीषदेत ते बोलत होते. स्पर्धेचे आयोजक धीरज घाटे आणि उद्योजक पुनीत बालन यावेळी उपस्थित होते. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात प्रश्न विचारले असता, फडणवीस म्हणाले, ‘आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडीयन आहोत, आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो निश्चित बंद केला जाईल, त्याची आम्ही सुरुवात केली आहे.
योजनेसाठी कुठलाही नवीन निकष नाही. योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषांपेक्षा वेगळा ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरच ही कारवाई होते आहे. आमच्या काही लाडक्या बहिणींनी स्वतः हून आम्ही निकषा बाहेर गेलो असल्याचे सांगत योजनेचा लाभ घेणे सोडले आहे. आम्ही कोणाकडून पैसे परत घेणार नाही. आम्ही जनतेच्या पैशाचे कस्टोडियन आहोत. आम्हालाही महालेखापालांना उत्तर द्यावे लागते. त्यामुळे नियमाच्या बाहेर जर कोणाला फायदा पोहोचत असेल तर तो थांबविला जाईल. जे नियमाच्या बाहेर फायदा घेताय त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल त्याची सुरुवात आम्ही केली आहेे, असे फडणवीस म्हणाले.
सोलापूरकर यांच्यावर कारवाई?
अभिनेता राहुल सोलापुर यांच्या वादग्रस्त विधानाविषयी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पहिल्यांदा तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे की, छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर बोलत असताना जनभावनेचा विचार करूनच आपण बोलले पाहिजे. त्यामुळे लोकांची भावना दुखावेल अशा प्रकारच्या इतिहासाचे वर्णन किंवा इतिहासाचे विकृतीकरण हे कोणाच्या हाताने होऊ नये. यासंदर्भात त्यांनी माफी देखील मागितलेली आहे. त्यासंदर्भात जी काही योग्य कारवाई होईल.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्ली विधानसभेत भाजपला मिळालेले यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जनतेने दाखविलेला विश्वास आहे, असे नमूद केले. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटला आहे. सातत्याने खोटी आश्वासन देऊन आणि ज्या प्रकारे त्यांनी राज्य केले त्या परंपरेचा अंत झालेला आहे. खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलेले आहे. दिल्लीतील विजय म्हणजे विकासाला दिलेल मत आहे. भाजपचे सरकार तेथील जनतेच्या आशा, आकांक्षा निश्चित पुर्ण करेल. राहुल गांधी यांच्याकडून होणार्या टीकेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. दिल्लीत काही मिळणार नाही हे लक्षात आले होते, त्यामुळे हरल्यानंतर काय बोलायचे हे राहुल गांधी यांनी ठरविले होते. त्यांचे सध्या कव्हर फायरींग सुरु आहे.
Related
Articles
पिंपरीमध्ये अल्पवयीन मुलाकडून गावठी कट्टा जप्त
10 Mar 2025
पाकिस्तानचा दावा बीएलएने फेटाळला
15 Mar 2025
हार्दिक पांड्याचे पाकिस्तानी पत्रकाराला मजेशीर उत्तर
11 Mar 2025
दहशतवादाचा केंद्रबिंदू संपूर्ण जगाला माहीत
15 Mar 2025
भूसंपादनाअभावी रखडला पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग
12 Mar 2025
ध्वनिमर्यादेचे उल्लंघन करणार्या प्रार्थनास्थळांवरील भोंग्यावर कारवाई

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)