सिमला : हिमाचल प्रदेशात बुधवारी हिमवर्षाव झाला. प्रामुख्याने तो पर्यटन स्थळ परिसरात झाल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. हवामान खात्याने मेघगर्जनोसह पावसाचा अंदाजही वर्तविला असून यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, सिमला, कुल्लू, किनौर, लाहुल आणि स्पिटी, व चंबा जिल्ह्यात हिमवर्षाव झाला. सिमल्यातल पर्यटनस्थळे अनुक्रमे नारकांडा आणि कुफ्री, चंबातील डलहौसी आणि कुल्लू परिसरातील मनाली येथेे हिमवर्षाव झाला आहे. त्यामुळे तेथे आलेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मंडी जिल्ह्यातील काही भागात हिमवर्षाव झाला. त्यामध्ये सीराज, प्रशेर, शिकारी आणि कामरुपचा समावेश आहे.
Fans
Followers