नोएडातील चार शाळांत बाँबची धमकी   

नोएडा : नोएडातील चार शाळांत बुधवारी बाँब ठेवल्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर ती अफवा असल्याचे उघड झाले. यानंतर नियमित वर्ग सुरू झाले.शाळांमध्ये बाँब ठेवल्याची धमकी ई मेलद्वारे देण्यात आली होती. त्यानंतर बाँब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळीं दाखल झाले. त्यांनी तपासणी केली. तेव्हा धमकीत तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले.  दरम्यान, खोटा ई मेल पाठविणार्‍याचा तपास सायबर पोलिसांकडे सोपविला आहे. धमकीचा ई मेल आल्याचे समजताच पालकांमध्ये घबराट पसरली. त्यांनी शाळांकडे धाव घेतली होती. तपासणीं सुरू असल्याने त्यांना शाळेत जाण्यास परवानगी दिली नाही. परंतु मुलें सुरक्षित आहेत. काळजी करू नका, असे पोलिसांनी सांगताच पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Related Articles