पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रयागराजमधील संगमात स्नान   

गंगा मातेला दूध आणि साडी केली अर्पण 

प्रयागराज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी प्रयागराजमधील संगमात स्नान केले.भगव्या रंगाचे कपडे, घातले होते. हातावर आणि गळ्यात रुद्राक्षाच्या माळा मंत्रोच्चाराच्या आणि समवेत मोदींनी संगमात डुबकी मारली. स्नानानंतर,सूर्याला अर्घ्य अर्पण करून, सुमारे ५ मिनिटे मंत्र जपत सूर्यपूजा केली. संगम नाक्यावर गंगेची पूजा करताना गंगा मातेला दूध आणि साडी अर्पण केली.
 
संगममध्ये स्नान केल्यानंतर मोदींनी समाजमाध्यमांवर लिहिले - आज महाकुंभातील पवित्र संगममध्ये स्नान करून मीही कोट्यवधी लोकांप्रमाणे धन्य झालो आहे. गंगा माता सर्वांना असीम शांती, ज्ञान, सौहार्द आणि चांगले आरोग्य देवो.
 
गंगेची पूजा केल्यानंतर मोदी बोटीने थेट अरैल घाटावर पोहोचले. तिथून दिल्लीला रवाना झाले. मोदींच्या संगम स्नानादरम्यान मुख्यमंत्री योगी देखील तिथे उपस्तिथ होते. मोदी प्रयागराजमध्ये दोन तास राहिले. महाकुंभात भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये म्हणून पंतप्रधानांनी कार्यक्रम मर्यादित ठेवला. ते कोणालाही भेटले नाहीत. 
 
मोदींचे विमान सकाळी १०.३० वाजता दिल्लीहून बामरौली विमानतळावर पोहोचले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान विमानतळावरून हेलिकॉप्टरने डीपीएस हेलिपॅडवर पोहोचले. तिथून त्यांचा ताफा अरैलच्या व्हीआयपी घाटावर पोहोचला. पुढे योगींसोबत बोटीने ते संगमला पोहोचलो. पंतप्रधानांच्या भेटीमुळे, मेळ्यातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. संगम परिसरात निमलष्करी दलही तैनात करण्यात आले होते. पंतप्रधानांचा ५४ दिवसांत महाकुंभाला हा दुसरा दौरा आहे. यापूर्वी ते १३ डिसेंबर रोजी तिथे गेले होते.

Related Articles