इस्लामाबाद, रावळपिंडीत राहणार्‍या अफगाणी नागरिकांची हकालपट्टी होणार   

इस्लामाबाद : पाकिस्तानाची राजधानी इस्लामाबाद आणि रावळपिंडीत राहणार्‍या आणि नोंदणी झालेल्या अफगाणिस्ताच्य नागरिकांना मायदेशी पाठवण्याची योजना सरकारने आखली आहे. ज्यांची ओळख पटली आहे त्यांच्यावर हकालपट्टीची कारवाई केली जाणार आहे. 
 
प्रशासनाने अफगाणिस्तानच्या नागरिकांना मायदेशी पाठवण्याचे आदेश दिले असले तरी त्याबाबत अधिकृत  घोषणा केलेली नाही, असे डॉन वृत्तपत्राने म्हटले आहे. घुसखोरांची हकालपट्टी करण्यासाठीं पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी अनेक बैठका नुकत्याच घेतल्या आहेत. एका बैठकीला लष्कर प्रमुख जनरल सईम आसिम मुनीर उपस्थित होते. तेव्हा निर्णय घेतल्याचे पंतप्रधान कार्यालयाने 
स्पष्ट केले.
 
पहिल्या टप्प्यात ज्यांची ओळख पटली आहे आणि ज्यांच्याकडे अफगाणिस्तानचे नागरिकत्व आहे. अशांवर प्रथम कारवाई केली जाणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांसंदर्भातील संस्थेने अफगाणिस्तानच्या नागरिकांना परत पाठवण्यास तूर्त बंदी घातली होती. पण, ज्यांच्याकडे नागरिकत्वाची ओळखपत्रे आहेत त्यांना मायदेशी पाठवले जाईल, अशी भूमिका पाकिस्तानच्या सरकारने घेतली आहे. ज्या नागरिकांकडे नाेंंदणीकृत ओळखपत्र आहे. तसेच जे कायद्याने राहात आहेत. त्यांच्यावर दुसर्‍या टप्प्यात कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पाकिस्तानात नोंदणीकृत ओळखपत्र असलेले १० लाख ३० हजार आणि आणि नागरिकत्व ओळखपत्र असलेले  ७ लाख अफगाणिस्तानचे नागरिक राहात आहेत.

Related Articles