E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
चिखलीतील खून प्रकरणी तिघांना अटक
Wrutuja pandharpure
05 Feb 2025
पिंपरी
: चिखलीतील टीलनगर येथे एका अनोळखी व्यक्तीचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली होती. खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटवून या गुन्ह्यात तिघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकने केली आहे.
भैय्या गमन राठोड (वय ३३, रा. पाटीलनगर, चिखली. मूळ रा. जळगाव) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी सुरज हनुमंत इंगळे (वय २९), मेहुल कैलास गायकवाड (वय २८), अजय अशोक कांबळे (वय २४, रा. पाटीलनगर, चिखली) यांना अटक करण्यात आली आहे. पाटीलनगर चिखली येथे वन विभागाच्या जागेत एका व्यक्तीचा खून झाल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकने या गुन्ह्याचा समांतर तपास केला. परिसरातील ५० ते ६० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली. त्यांना चिखलीमधून ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी दारू पिण्यासाठी पैसे काढून घेण्यासाठी हा खून केल्याचे सांगितले. खून झालेला व्यक्ती भैय्या राठोड हा मागील तीन महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात कामासाठी आला होता. आरोपी अजय कांबळे याच्यावर चिखली, पिंपरी आणि महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलीस अंमलदार महादेव जावळे, सोमनाथ बोर्हाडे, मनोजकुमार कमले, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, श्रीधन इचके, अजित रुपनवर, तुषार वराडे, प्रमोद गर्जे, मारोती जायभाये, स्वप्नील महाले, तानाजी पानसरे यांनी केली.
Related
Articles
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
विठ्ठल मंदिराच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगचा पुरातत्व विभागाने लेखी अहवाल द्यावा
12 Mar 2025
मणिपूरमध्ये शांतता कधी? (अग्रलेख)
11 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
10 Mar 2025
इस्रोचे स्पॅडेक्स मिशन यशस्वी
14 Mar 2025
पाकिस्तानच्या लष्करी तळावर आत्मघातकी हल्ला
14 Mar 2025
आयजीआय : अनमोल हिरा
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
भैयाजींची पश्चात बुद्धी (अग्रलेख)
3
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा पदवीप्रदान सोहळा उत्साहात
4
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने पुढचे पाऊल
5
नव्या प्राप्तिकर विधेयकामुळे कंपन्यांच्या अडचणीत वाढ
6
निसर्ग, भवतालासह विज्ञान रंजनाची झालर असलेल्या कथा