पिंपरी : एका वृद्ध महिलेला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत २४ लाख ८१ हजार ५४७ रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. याप्रकरणी ६० वर्षीय महिलेने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रणिता जोशी नावाच्या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने फिर्यादी यांना एका ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले. तिथे फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. विश्वास संपादन करून २४ लाख ८१ हजार ५४७ रुपये भरण्यास सांगत त्यांची फसवणूक करण्यात आली. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.
Fans
Followers