सासरच्या लोकांच्या नावे ऑनलाईन कर्ज काढून फसवणूक   

पुणे : समाजमाध्यमावरील ओळखीतून त्यांच्यामध्ये प्रेम झाले आणि दोन्ही कुटुंबातील सदस्यांच्या संमतीने त्याने लग्नदेखील केले. मात्र, सासरी नांदत असताना पतीने तिच्या माहेरच्या नावावर ऑनलाईन कर्ज काढले. त्यानंतर,  कर्जाचे हप्ते न भरल्याने बँकेचे लोक तिच्या वडिलांच्या घरी जाऊ लागले. त्यानंतरदेखील, वडिलांकडून पैसे आणण्यास सांगितले. तिने पैसे आणण्यास नकार दिल्यामुळे त्याने लग्नानंतर ५ महिन्यातच पत्नीला घरातून हाकलले.
 
मांजरी येथील २४ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून, तिचा पती रोहित राजू थोरात (स्वरुप अपार्टमेंट, छ. संभाजीनगर) याच्यासह सासु, सासरे, नंणद अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार २५ एप्रिल ते ८ सप्टेंबर २०२४ दरम्यान घडला. तक्रारदार यांची २०१९ मध्ये इंस्टाग्राम या समाजमाध्यवरून रोहित थोरात याच्याशी ओळख झाली. त्यांच्यात सुरू असलेल्या चॅटिंगच्या माध्यमातून त्यांच्यात मैत्री झाली होती.

Related Articles