E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
आले, लसूण, काकडी, शिमला मिरची आणि मटारच्या दरात घसरण
Wrutuja pandharpure
03 Feb 2025
पुणे
: गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (दि.०२) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक कमी झाली आहे त्यातच अपेक्षित मागणी नसल्याने आले, लसूण, काकडी, शिमला मिरची आणि मटारच्या भावात घसरण झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.
विविध भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात आणि आंध्रप्रदेश येथून हिरवी मिरची सुमारे ८ ते १० टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून कोबी ४ ते ५ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा आणि पावटा प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो, आंध्रप्रदेश, तमिळनाडू येथून शेवगा ३ ते ४ टेम्पो, राजस्थान येथून १४ ते १५ ट्रक गाजर, कर्नाटकातून २ टेम्पो भुईमुग शेंग,मध्यप्रदेशातून सुमारे १७ ते १८ टेम्पो मटार, तामिळनाडूतून १ टेम्पो तोतापूरी कैरी, मध्यप्रदेशातून लसूण सुमारे १० ते १२ टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ६०० ते ७०० गोणी, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ४ ते ५ टेम्पो, काकडी ८ ते १० टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, हिरवी मिरची प्रत्येकी ४ ते ५ टेम्पो, टोमॅटो १० ते १२ हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा सुमारे ७० ते ८० ट्रक, इंदौर,आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३५ ते ४० टेम्पो इतकी आवक झाली होती.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : २००-२५०, बटाटा : १३०- २००, लसूण : ५००- १५००, आले सातारी: २५०-२७०, भेंडी : ३००-५००, गवार : ६००- ८००, टोमॅटो : ८०-१००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : ३००-४००, दुधी भोपळा : १००-२००, चवळी : २५०- ३००, काकडी : १२०-१६० कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी : २००-२५०, पापडी : ३००-३५०, पडवळ : २००-२५०, फ्लॉवर : १००-१२०, कोबी : ६०- ८०, वांगी : २५०-३००, डिंगरी : ३००-४००, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : २००-२५०, तोंडली : कळी : ३००-३५०, जाड : १८०-२००, शेवगा : ५००-६००, गाजर : १५०-२००, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : ३००, कोहळा : १००- १५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००-२५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ७००-७५०, मटार : परराज्य : २८०-३००, पावटा : ५००- ५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, तोतापुरी कैरी : १२००-१३००, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.
कोथींबीर, चवळईच्या भावात वाढ
गुलटेकडी येथील मार्केटयार्डात रविवारी (दि. ०२) करडई, अंबाडी आणि पालकच्या भावात घट झाली असून कोथींबीर आणि चवळईच्या भावात वाढ झाली आहे तर मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पुदीना, मुळे, राजगिरा, चुका आणि हरभरागड्डीचे भाव स्थिर होते़ दरम्यान कोथींबीरीची दीड लाख जुडी तर मेथीची ७० हजार जुडींची आवक झाली़
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ४००-८००, मेथी : ६००-१०००, शेपू : ५००- ८००, कांदापात : ८००-१०००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-६००, पुदिना : ३००- ६००, अंबाडी : ३००-५००, मुळे : ६००-१०००, राजगिरा : ४००- ६००, चुका : ५००-८००, चवळई : ३००-६००, पालक : ५००-८००. हरभरागड्डी : ५००-१०००़ बोरे आणि पपईच्या भावात वाढ तर लिंबाच्या भावात घसरण गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील फळबाजारात बोरे आणि पपईच्या भावात वाढ झाली असून लिंबाच्या भावात घसरण झाली आहे तर अननस, संत्रा, मोसंबी, कलिंगड, खरबूज, चिक्कू, पेरुचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली.
गुलटेकडी येथील मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (दि.०२) फळबाजारात जुन्या आणि नवीन बहरातील मोसंबी ४० ते ५० टन, संत्रा ५० ते ६० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई ३० ते ४० टेम्पो, लिंबांची सुमारे दीड हजार गोणी, कलिंगड २५ ते ३० टेम्पो, खरबूज ७ ते ८ टेम्पो, चिक्कू एक हजार बॉक्स, पेरु १०० क्रेट, अननस ६ ट्रक, बोरांची पाचशे गोणी इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १५०-७००, जुना बहार मोसंबी : (३ डझन) : ३८०-८००, (४ डझन) : २५०-३५०, नवीन बहार मोसंबी (३ आणि ४ डझन) : २५ ते २२०, संत्रा : (१० किलो) : २५०-१०००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ८०-२६०, आरक्ता : ३०- १००, गणेश : १०-५०, कलिंगड : ८-१२, खरबूज : २०-३५, पपई : ८-२५, चिक्कू (दहा किलो) : १००-५००, पेरु (२० किलो) : ५००-७००, अननस (१ डझन): १००-६००, बोरे (१० किलो) चमेली : २८०-३४० उमराण : ८०-१२०, चेकनट : ९००-१०००, चण्यामण्या: ७००-८००.
झेंडूच्या दरात वाढ
गुलटेकडी मार्केटयार्ड येथील फुलबाजारात झेंडू वगळता अन्य सर्व फुलांची आवक जावक कायम आहे. मात्र, आवक कमी पडल्याने झेंडूच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली़.
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे
झेंडू : ३०-५०, गुलछडी : ६०-१००, अॅष्टर : जुडी ८-१२, सुट्टा ५०-७०, कापरी : १०-४०, शेवंती : ५०-१००, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : २०-६०, डच गुलाब (२० नग) : १५०-२५०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : १५०-२५०, शेवंती काडी १५०-२५०, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ४००-
६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ५०-७०, जिप्सोफिला : ६०-१२०.
Related
Articles
वाचक लिहितात
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात
10 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात
10 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात
10 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
वाचक लिहितात
12 Mar 2025
कॅनडा, युरोपियन महासंघाचे ट्रम्प यांना जशास तसे उत्तर
14 Mar 2025
वाचक लिहितात
10 Mar 2025
यंदा गहू राहणार सर्वसामान्यांच्या आवाक्यात
10 Mar 2025
तुलसी गब्बार्ड येणार भारत दौर्यावर
12 Mar 2025
पुण्याच्या लौकिकाला काळिमा
10 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
कोकण, विदर्भात उष्णतेची लाट येणार
2
पाकिस्तानात रेल्वेचे अपहरण २० सैनिक ठार; १८२ जण ओलिस
3
भारतचं चॅम्पियन
4
अघोषित दिवाळखोरी (अग्रलेख)
5
मेट्रो स्थानकातील आंदोलन; नऊजणांना पोलिस कोठडी
6
कल्पनेचाही खडखडाट(अग्रलेख)